बोत्स्वाना
शहरे आणि गावे

बोत्स्वाना

Category:

 

बोत्स्वाना हा हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोत्स्वानाच्या आग्नेय व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका, पश्चिमेला व उत्तरेला नामिबिया, उत्तरेला झांबिया तर वायव्येला झिम्बाब्वे हे देश आहेत. बोत्वासाचा ७० टक्के भाग कालाहारी वाळवंटाने व्यापला आहे. गाबोरोनी ही बोत्स्वानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. केवळ ३.४ इतकी लोकसंख्या घनता असलेला बोत्स्वाना जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे.

  October 6, 2018


बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
शहरे आणि गावे

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना

Category:

 

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९४५ ते १९९२ सालादरम्यान बॉस्निया आणि हर्झगोव्हिना भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता.

  October 6, 2018


भूतान
शहरे आणि गावे

भूतान

Category:

 

भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  October 6, 2018


बेलीझ
शहरे आणि गावे

बेलीझ

Category:

 

बेलीझ हा मध्य अमेरिकेतील एक लहान देश आहे. बेलीझच्या उत्तरेस मेक्सिकोचा युकातान द्वीपकल्प, पश्चिमेस व दक्षिणेस ग्वातेमाला तर पूर्वेस कॅरिबियन समुद्र आहेत. इंग्लिश ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे.

  October 6, 2018


p-4115-Cote d'Ivoire
शहरे आणि गावे

कोत द’ईवोआर

Category:

 

कोत द’ईवोआरचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République de Côte d’Ivoire; पूर्वीचे नावः आयव्हरी कोस्ट) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. कोत द’ईवोआरच्या पश्चिमेला लायबेरिया व गिनी, उत्तरेला माली व बर्किना फासो तर पूर्वेला घाना हे देश आहेत. देशाच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. यामूसूक्रो ही कोत द’ईवोआरची राजधानी तर आबीजान हे सर्वांत मोठे शहर आहे.

  October 5, 2018


इक्वेटोरीयल गिनी
शहरे आणि गावे

इक्वेटोरीयल गिनी

Category:

 

इक्वेटोरीयल गिनीचे प्रजासत्ताक हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखाताच्या किनार्‍यावरील एक छोटा देश आहे. ह्या देशाचे दोन भाग आहेत: पहिला, कामेरूनच्या दक्षिणेला व गॅबनच्या वायव्येला असलेला खंडांतर्गत भाग, व दुसरा अटलांटिक महासागरातील अनेक लहान मोठी बेटे. इक्वेटोरियल गिनीची राजधानी व सर्वांत मोठे शहर मलाबो हे बियोको नावाच्या एका बेटावर वसले आहे. ह्या देशाच्या नावात जरी विषुववृत्त असले तरी देशाचा कोणताही भाग विषुववृत्तावर मोडत नाही.

  September 12, 2018


एल साल्वादोर
शहरे आणि गावे

एल साल्वादोर

Category:

 

एल साल्व्हाडोरचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील सर्वांत लहान व सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा देश आहे. साल्व्हाडोरच्या पश्चिमेला होन्डुरास, उत्तर व पूर्वेला ग्वातेमाला तर दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. सान साल्व्हाडोर ही साल्व्हाडोरची राजधानी व सर्वात मोठे शहर असून सांता आना व सान मिगेल ही इतर महत्त्वाची शहरे आहेत.

  September 12, 2018


अझरबैजान
शहरे आणि गावे

अझरबैजान

Category:

 

अझरबैजान हा मध्यपूर्व आशियातील व पूर्व युरोपातील एक देश आहे. कॉकासस प्रदेशामधील सर्वात मोठा देश असलेल्या अझरबैजानच्या उत्तरेला रशिया, वायव्येला जॉर्जिया, पश्चिमेला आर्मेनिया व दक्षिणेला इराण हे देश आहेत तर पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अझरबैजान हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते.

  September 12, 2018


बहारीन
शहरे आणि गावे

बहारीन

Category:

 

बहरैन (मराठीत बहारीन, बहरीन(हिंदी), बाऽरेन्(इंग्रजी)) हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे. मनामा ही बहारीन देशाची राजधानी आहे.

  September 12, 2018


डॉमिनिकन प्रजासत्ताक
शहरे आणि गावे

डॉमिनिकन प्रजासत्ताक

Category:

 

डॉमिनिकन प्रजासत्ताक हा कॅरिबियनमधील एक देश आहे. डॉमिनिकन प्रजासत्ताक हिस्पॅनियोला बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. ह्या बेटाचा पश्चिम भाग हैती देशाने व्यापला आहे.

  September 9, 2018