कथा

मसनातलं जिनं

Category:

 

भर दुपारची येळ व्हती.वर आभाळातुन सुर्य आग वकत व्हता.उन्हाळ्याचे दिवस आसल्यानं सगळा परिसर भकास दिसत व्हता.रस्त्यानं चिट पाखरूबी नवतं.आश्यात शिवराम मसनजोगी,त्याची बायको शेवंती,पोरगी सारजी आन पोरगं पिर्‍या बाभळगावच्या दिशेनं निंघाले होते.

  February 2, 2026


कथा

काकड आरती

Category:

 

रामदास काकांनं लाऊड स्पीकरात हळी देली आण मंग मलं लय आनंद झाला. तसं पाह्यलं तं काकड आरतीचा काकडा आण परसाद याच्यासाठी गावातल्या बऱ्याच जणायची चढावढं लागायची, म्या बी मांघल्ल्या पाच-सात दिसापसनं परयत्नात व्हतो. आखरच्यान आज कुठं मव्हा नंबर लागला व्हता. मव्ह नाव पहाटं पहाटं लावूड स्पीकरात वाजलं व्हत त्यामुळ मल लय भरून आलतं.

  February 2, 2026


कथा

केशवा

Category:

 

मी म्हणाले. तसा घाबरत घुबरत सुकेश माझ्याजवळ आला.माझ्या पुढच्या खुर्चीवर पाय उकड ठेऊन बसला.तो फार घाबरलेला दिसत होता.त्याच्या मनात काहीतरी गुंतागुंत चालली होती.त्याचा चेहरा घाबरून पांढराफटक पडलेला दिसत होता.मला त्याचं हे बावळट रूप पाहुण कसतरीच वाटलं.सुकेश माझ्या बाजुलाच रहायचा.विस पंचवीशीचा तरून असावा मात्र जख्ख म्हातारा दिसायचा.शरीरयष्टीने तो एकदम हडकुळा दिसत होता.शरीरात मांस असाव की नाही ईतपत संशय घेण्याजोगे त्याचे शरीर होते.अंगाची चामडी हडांवर घट्ट चिकटलेली वाटायची.तोंडाचं बोळकं झालेलं तर डोळ्याच्या खोबनितुन त्याचे पिवळट पांढरट डोळे लुकलुकत रहायचे.डोळ्यांच्या वर नाममात्र भुवया होत्या.तर असो.

  February 2, 2026


कथा

प्रवास

Category:

 

नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं.तिथल्या कॉलेजात मव्हा नंबर लागला व्हता.पहाटं नवची एष्टी व्हती.नवनंतर एष्टी नसल्यानं म्या पाहाटं लवकरच गडबडीनं आटपुण निंघायची तयारी केली.निघंतानी पुन्हा एकदा कागदपत्र निट तपासले.

  February 2, 2026


कथा

खेड्यातले येडे

Category:

 

लहानपणापसुन गण्या खेड्यातच राह्यलेला आसते.त्यालं त्या खेड्याच्या बाहिरच कायबी माहीत नसते…….त्यानं आयुष्यात कव्हा त्याच्या गावच्या बाहिर गेलेला नसते.गण्या नेमकाच मॅट्रिक पास झालता.त्याच्या गावातले बरेच जनं मॅट्रीकनंतर शहरात कामधंद्यासाठी जायाचे,पिर्‍या,मव्हण्या,सुरश्या,संज्या,ज्ञान्या आसे बरेचजनं मॅट्रीकनंतर शहरात गेलते.ते गावाकडं आले कि शहरातल्या लय गप्पा टप्पा सांगायचे.शहरातले लोकं आसे राहतातं,तसे राहतातं.

  February 2, 2026


कथा

शिकार

Category:

 

चिणक्या,गोल्या,रवी आन चेंड्या लहानपणापसुनच जिगरी दोस्तं व्हते.एकाच वयाचे अन एकाच शाळतं शिकल्यान तेह्यचा दोस्ताना आंजुकच घट्ट झाला व्हता.ते चौघबी लयच ईपितर व्हते.काम धंदा त काय करायचे नाही पण घरच्यायच्या जिवावरं मस्तपैकी जगुन दिसभर गावात काड्या करत हूंदडायचे.नको तिथं नाक खुपसण्याच्या तेह्यच्या सलयीधं सगळं गाव परेशान व्हतं.एकदिवस आसचं चौघं दोस्त पारावर बसले व्हते.लय दिवसाचं तेह्यच्या जिवनात एंजायमेंटच नवती.गावातबी तेह्यच्या कुरापती चालयण गेलत्या.चौघंबी शांत बसले व्हते.तेव्हड्यात गोल्या मनला,“व्हयं रं चंड्या आपण लय दिसाचं मटनबी खाल्ल नाही आन नरडंबी वल्ल केलं नाही.तव्हा मी काय मंतो आज सुकीरवार हे तं आपण पार्टी करायची का…?”

  February 2, 2026


कथा

वटपौर्णिमा (कथा)

Category:

 

मीरग संपत आलता. आभाळ ठणठण व्हतं.ढग कुठ बियाल पण दिसत नव्हते.निराशेनं कौतीका वसरीत दुचित बसला व्हता. मनात घालमेलं चालली व्हती.काय कराव ते त्यालं काय बी सुदरयनं गेलतं.बसल्या जागुन उठायलं आवसन व्हत नवतं.त्यालं आस वाटु लागलं की आभाळानं ढगायबरोबरच आपलं आवसन बी पळवलय की काय.अन्नाचा घास गोड लागयन गेलता.मंग जरा चहान तरी बर वाटल मनुन कस बस वसरीतुन उठत त्यानं नेमकच पाणी शेंदुन आलेल्या बायकोल,ईमलीलं चहा कर आसं मनलं.तस वस्काळतच ईमली त्यालं मनली,“घरात गुळ ,साकर्‍या,पत्ती कशाचाच पत्त्या नाय….सगळे डब्बे तुमच्यासारखेच ठणठण गोपाळ झालेतं.आज वडपौर्णिमेचा सन हे.जरा दुकानावर जाऊन किराणा माल आणा.काय बाई किती वढाव एकटीन संसार. या माणसाचं बिलकुल जरासं सुद्धा घरात लक्ष नाही.मी आहे म्हणून टिकली या घरात….दुसरी कोणी टिकली नसती. काय पाहून बापानं मलं या घरी दिलं काय माहीत.कोण्या जन्माचा सुड काढला बापाणं काय ठाऊक माय…. ये पोर्‍हयवो काय हुडदंग माजवलाय रे….ईकडं या .ईथ बसा मह्यापुढं अभ्यासालं.”

  January 20, 2026


कथा

गॅदरींग….

Category:

 

कॉलेजच्या नोटीस बोर्डावर गॅदरींगची नोटीस लागली होती.हे जस समजल तसं गण्यानं टुन्नकन उडीच मारली.गण्या कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमीच पुढं पुढं करायचा.गण्यालं नाटकात काम करायची लय हौस होती.तसं पाहिलं तर लहान पणापासुनच गण्याच्या अंगात अभिनयाची गोम वळवळ करायची.तर असा हा गणेश उर्फ गण्या रणवीर नाटकाचा प्रचंड शौकीन होता.गल्लीत गणपती बसले की गण्याच्या ग्रुपचा नाटकाचा एक कार्यक्रम हमखासच असायचा.गण्याला आपली कला लोकांपुढं पाजळायलं लय भारी वाटायचं. श्रीराम लागु,विक्रम गोखले,दाजी पणशीकर ते हल्लीच्या प्रशांत दामले पर्यंत त्याने सर्वांचे नाटकं पाहिले होते.नाटकाचा शौकीन असलेल्या गण्याला चित्रपटांविषयी मात्र प्रचंड राग होता.तो नाटकाला अभिजात कलाकृती मानायचा तर चित्रपटाला कलेला लागलेला कलंक मानायचा.तस गण्या नाटकात चांगलं काम करायचा पण कुठल्या प्रेक्षकांपुढं काय सादर करावे हे गणित त्याला कधीच जुळले नाही.त्यामुळे नेहमीच त्याची फजीती व्हायची.एकदा असच गल्लीतल्या रसीक प्रेक्षकांपुढं गण्यानं कुठलंतरी एक प्रायोगीक नाटक सादर केलं.विषय ग्रामस्थांच्या डोक्यावरून गेलाच पण नाटकातले काही संवाद देवा धर्माविरोधात आसल्यानं पब्लीक खवताळली आण मग त्यांनी जे गण्याचा समाचार घेतला ते गण्या आठ दहा दिवस तरी खाटेला चिकटुनच राहिला होता.

  January 20, 2026


कथा

संसार

Category:

 

कुमार गंधर्वांच्या आवाजातली ही अमर भूपाळी शंकर मथार्‍याच्या टेपरिकॉर्डरवर लागली तसं सारजाची झोप मोडली.शंकर मथार्‍याच्या टेपरिकॉर्डरचा भोंगा वाजनं आण गल्लीतल्या बायामाणसांचं पहाटचं उठनं हे मागील काही वर्षांपासून गल्लीतल्या बायकांसाठी नेहमीचच होतं.गावात फक्त शंकर म्हाताऱ्याच्या घरीच टेपरिकॉर्डर होता. शंकर मथरा पहाट सुखाची चांदणी निघाली की मोठ्ठया आवाजात आपला टेपरेकॉर्डर सुरू करायचा. सारजा जरा गडबडीनच उठली. कामाचा लय रोंभा पडला व्हता,त्यात पेरणीचे दिवस व्हते. पहाटचे सगळे कामं आटपुन शेतात जायचं व्हतं. तिनं उठून तोंडावर पाण्याचा सपकारा मारला,केसं नीट करून बुचडा बांधला अन चुली जवळ जाऊन चुलीतला एक भला मोठा ढेपसा हातावर घेऊन दात घासत घासत तिच्या नवऱ्याल,दौलतल आवाज दिला.पेरणी पाण्याचे दिवस असल्यानं दिवसभरच्या कष्टानं थकून दौलत आरमोडून झोपला व्हता. त्यालं तसं झोपलेलं पाहून सारजाच्या डोळ्यालं समाधान वाटत होतं. खरं म्हंजे कामाचा लय रोंभा पडला होता पण तरी बी त्याची झोप न मोडु देता तशीच ती उठली . पारोश्या अंगानं सयपाक पाणी करू नाही मंतात…! सारजीलं लहानपणापासूनच थंड पाण्यानं आंघुळ करायची सवय होती,म्हणून मग आधी तिनं आंघुळ करून घेतली. तव्हरोक दौलत बी उठला होता. त्याच्याकडं रेडीओ होतख.रेडिओवर गाणे ऐकण्याचा त्यालं लय नाद होता. झोपतून उठून त्यांनं रेडिओवर विवीध भारती लावलं.तेव्हड्यातं नहानीतून आंघुळ करून बाहिर येणारी सारजा त्यालं दिसली. सारजालं पाहून त्याचे डोळे उघडे ते उघडेच राहिले.तिचा तो लांब लांब केसांचा वलबट केशसंभार पाहून तो खुळ्यागत तिच्याकडं पाहू लागला. तेवढ्यात रेडिओवर गाणं लागलं होतं…

  January 20, 2026


कथा

भुरा….

Category:

 

कर कचुन एसटीचा ब्रेक लागला अन् सिटवर बसुन मान खाली पाडुन पेंगाटलेल्या महादाची झोपमोड झाली. आपल्या हातातल्या ईस्टीलच्या चिमट्यानं गाडीतल्या लोखंडी रॉडवर प्रहार करत,“अय्य्….चलो भुर्‍याचीवाडी….चलो भुर्‍याचीवाडी…..!” असा कंडक्टरने पुकारा दिला आणि त्या पुकार्‍यानं महादा भानावर आला.आपल्या सोबतची शबनम बॅग गळ्यात लटकवत सोबतच्या सुदामा अन् रम्यालं आवाज देत तो गडबडीतच एस.टी.तून खाली उतरला.सुदामा आणि रम्याही त्याच्यापाठोपाठच एस.टी.तून खाली उतरले.भुऱ्याचीवाडी फाट्यावर उतरणारे ते तिघचं पॅसेंजर होते.रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजले असतील.अमावस्येची रात्र असल्याने काळा निबीड अंधार पडलेला होता.तसं पाहिलं तर त्यावेळी त्या रस्त्यावरून कुणीही जायचं नाही.त्यातही अमावस्येच्या रात्रीला तर बिलकुलच नाही.त्याला कारणही तसंच होतं ते म्हणजे भुऱ्याचं….! होय…. भुऱ्याचच…! भुऱ्याच्या नावावरूनच त्या गावाचं नाव भुऱ्याचीवाडी असं पडलं होतं.गावातली वाडवडील माणसं नेहमी भुऱ्याच्या वेगवेगळ्या अन् रंजक कहाण्या सांगायचे,म्हणुनच सहसा अमावस्येच्या रात्रीला त्या रस्त्यावर सामसुम असायची.त्या काळरातीला त्या रस्त्यावर भुऱ्याचं साम्राज्य असतयं असं गावकरी म्हणायचे.अमावस्येच्या रात्रीला बारा वाजल्यापासून ते सव्वा एक या कालावधीत भुर्‍या त्या रस्त्यावरील साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट असायचा असही म्हणतात.रात्रीच्या त्या प्रहरी जो कुणी भुर्‍याच्या त्या मायावी साम्राज्यात प्रवेश करायचा त्याचा खात्माच व्हायचा.भुऱ्या वेगवेगळ्या रूपात येऊन हे सर्व करतो असही गावातले म्हातारे -कोथारे लोकं सांगायचे.

  January 20, 2026