आई
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाआईची महती अनेक थोर कवींनी वर्णन केली आहे. ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई’ – माधव जूलियन, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ -यशवंत, ‘निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी – भा. रा. तांबे किंवा ‘अंतरले पाय तुझे हाय हाय माते ।’ – केशवसुत. आई आपल्या मुलाची मायेने काळजी घेते. त्याला घास भरवते. लहानाचा मोठा करते. आजारपणात सेवा करते. आईमुळेच घराला घरपण येते. मुलाला घडवण्यात, त्याच्यावर चांगले संस्कार करण्यात आईचा वाटा फार मोठा असतो. चार-पाच दिवस जरी आई घरापासून दूर बाहेरगावी गेली तर घर सुने सुने होऊन जाते. आईच नसलेले घर तर अगदी पोरके होऊन जाते. इतके आईचे स्थान महत्त्वाचे आहे.
January 26, 2025