लेखसंग्रह

ऑलिंपिक क्रिकेट आणि निकालबदलू कसोटी

Category:

 

… आणखी दोन वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या विनंतीवरून आंक्रिपने सामन्याचा निकाल बहालीवरून ‘अनिर्णित’ असा बदलला. थांबा. मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या सूचनेवरून (हा क्लब अत्यंत जुना आणि प्रतिष्ठित असून क्रिकेटच्या नियमांवर आजही त्याचेच राज्य आहे) पुढच्याच वर्षात आंक्रिपने सामन्याचा मूळ निकाल पुनःस्थापित केला.

  August 20, 2010


लेखसंग्रह

जॉर्जला सोडा; नाहीतर खेळ खल्लास

Category:

 

सकाळी सकाळी ग्राऊन्समनने खेळपट्टीवरील आच्छादने काढली आणि तो सर्दच झाला…खेळपट्टी खणून ठेवण्यात आलेली होती जागोजागी. धक्का पण तो पडला ब्रिटिश. खेळपट्टी दुरुस्त करून खेळापुरती योग्य करविण्यास किती वेळ लागेल याचे गणित तो करू लागला. ते शक्य असल्याची जाणीव त्याला झाली पण…

  August 19, 2010


लेखसंग्रह

हरहुन्नरी पाटील आणि वेळकाढू ‘क्लोज’

Category:

 

‘वेळ कसा मारुन न्यावा’ नावाचे पुस्तक वाचून आल्याप्रमाणे यॉर्की कप्तान वागत होता. ते त्याने वाचलेले नसेल तर कुणीही रसिक प्रेक्षक बसल्या बसल्या या शीर्षकाचे पुस्तक लिहून पूर्ण करू शकला असता! इंग्रजांना हे खपणार नव्हतेच. कप्तान ब्रायन क्लोज खपला.

  August 18, 2010


लेखसंग्रह

मिथाली राजचा विक्रम आणि ‘कुजबुजणारा’ मृत्यू

Category:

 

‘त्या’ बालिकेने वयाच्या विसाव्या वर्षी टॉन्टन काऊन्टी ग्राऊंडवर इंग्लिश महिलांच्या संघाविरुद्ध 407 चेंडूंमध्ये 214 धावा काढल्या. त्यात 19 चौकार होते आणि 10 तासाला केवळ दोन मिनिटे कमी एवढा वेळ तिचे मैदानावर ‘राज’ होते. कॅरेन रॉल्टनचा नाबाद 209 धावांचा विक्रम तिने मोडला.

  August 17, 2010


लेखसंग्रह

कॅलिप्सो धून आणि कॉवेन्ट्रीच्या 194

Category:

 

या बळीचा परिपाक … कॅरिबिअन बेटांवरील खेळाडूंच्या संघाने पहिल्याप्रथम इंग्लंडला त्यांच्याच देशातील कसोटी मालिकेत पराभूत केले. फ्रॅंक वॉरेल या सामन्यात खेळाडू म्हणून होते आणि वॉरेल, विक्स आणि वॉल्कॉट ही ‘तिडी’ या मालिकेनंतरच विख्यात झाली.

एग्बर्ट मूरने या विजयानंतर एक लोकगीत लिहिले आणि गायलेही.

  August 16, 2010


लेखसंग्रह

भारताविरुद्ध पहिले द्विशतक आणि फायरी फ्रेडचे त्रिशतक

Category:

 

भारत ब्रिटिशअंमलमुक्त झाल्यानंतरच्या कालचक्रातील 16 वार्षिक आवर्तने पूर्ण झाल्याच्या दिवशी कसोटी सामन्यांमधील गोलंदाजाचे पहिले त्रिशतक पूर्ण झाले. (सतरावा किंवा आजचा तथाकथित ’त्रेपन्नावा स्वातंत्र्यदिन’ असे म्हणणे ही शब्दांची क्रूर थट्टा तर आहेच…

  August 15, 2010


लेखसंग्रह

सामना रद्द करविणारा रॉबिन नि धडका घेणारा ब्रूस

Category:

 

…खेळाडूने मारलेला चेंडू प्रेक्षकांमध्ये गेला. तो एकाने परत फेकला – तो आला आणि पडला ब्रूसच्या डोक्यावर! भुवयांजवळ जखम झाली. बिचारा जवळच्या दवाखान्यात टाके घालून घेण्यासाठी जात असताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्याला एक कार धडकली. टाके घालण्याची प्रक्रिया …

  August 12, 2010


लेखसंग्रह

पंचाच्या कुटुंबाला प्रसाद नि हेडिंग्लेवरील चमत्कार

Category:

 

हेडिंग्लेवर एक चमत्कार. वसिम अक्रमचा चेहरा धूमकेतूच्या शेपटाने माऊन्ट एव्हरेस्टला धडकून जाण्याची घटना नुकतीच पाहिल्यासारखा झाला होता. तब्बल सहा वर्षांच्या अंतरानंतर इंग्लिश कप्तान माईक आथर्टनने कसोटी सामन्यात चेंडू टाकण्यासाठी हात फिरवला होता…

  August 11, 2010


लेखसंग्रह

दोन्ही डावात शतक आणि जॉफचे शतकांचे शतक

Category:

 

1920मध्ये कसोटी क्रिकेट पुनरुज्जीवित झाले तेव्हा वॉरन वयाच्या पस्तिशीत होता. त्याचा धडाका नंतर टिकला नाही. एका कसोटीत दोन शतके काढणार्‍या या फलंदाजाला आपल्या कारकिर्दीतील पुढच्या शतकासाठी तब्बल 17 वर्षे वाट पाहावी लागली.

  August 10, 2010