लेखसंग्रह

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि पाकिस्तान पंतप्रधानाची अजमेरच्या दर्ग्याला भेट

Category:

 

हैदराबाद बॉम्बस्फोटांत सांडलेले निरपराध्यांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. आक्रोश आणि किंकाळ्या अद्याप थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानी अतिरेक्यांनी श्रीनगरमधील ‘सीआरपीएफ’च्या कॅम्पवर १३/०३/२०१३ ला आत्मघाती हल्ला केला. ‘अतिथी देवो भव:’ ही भारताची संस्कृती आहे. मात्र, ती विश्‍वासघातकी अतिथीला लागू पडत नाही. भारताचा सतत द्वेष करणार्‍या, सतत भारताशी जमेल तेथे शत्रुत्व करणार्‍या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र पायघड्या घालत हे सरकार जाणार, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.

  March 15, 2013


लेखसंग्रह

बांगलादेशातील पाकिस्तानवाद्यांना निष्प्रभ करणे महत्वाचे

Category:

 

बांगलादेश आणि भारत या देशांत अस्वस्थता कशी नांदेल हे पाहणे हे पाकिस्तानी नेतृत्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे बांगलादेशातील विद्यमान घडामोडींबाबत आपण अधिक सजग असणे गरजेचे आहे. गेले काही आठवडे त्या देशात साचलेल्या खदखदीचे रूपांतर धर्माध आणि निधर्मी शक्ती यांच्यातील संघर्षांत झाले असून या संघर्षांची झळ आपल्याला लागणार आहे.

  March 13, 2013


लेखसंग्रह

फ्रान्सचे अध्यक्ष ओलांदे यांची भारतभेट

Category:

 

मालदीव, श्रीलंकेतील अलीकडच्या घडामोडींच्या निमित्ताने शेजारी राष्ट्रांबाबतच्या भारताच्या अनाकलनीय धोरणाचा पुन्हा प्रत्यय आला. पाकिस्तान, चीनबरोबरची डोकेदुखी कायम असताना बांगला देश, नेपाळ आदी शेजार्‍यांशीदेखील आपण सुरळीत संबंध राखू शकत नाही याला कारणीभूत ठरतात आपली चुकीची गृहितके. फ्रान्सच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर फ्रान्स्वा ओलॉद यांनी युरोपबाहेरील पहिल्या परदेश दौर्‍यासाठी भारताची निवड करावी, यावरून भारताबरोबरच्या संबंधांना तो देश किती महत्त्व देत आहे, ते कळते.

  March 2, 2013


लेखसंग्रह

ब्रह्मपुत्रा नदीवर चीनकडून बांधली जाणारी धरणे

Category:

 

ब्रह्मपुत्रा नदीवर  भारत-चीन सीमेजवळच ‘ग्रेट बेंड’ येथे चीनकडून बांधल्या जाणार्‍या मोठय़ा धरणाबाबत भारताने आक्षेप घेतले आहेत. फराक्का येथील बॅरेजवरून भारताकडे वळवल्या जाणार्‍या पाण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद सुरूच आहेत. भारताकडून जास्त प्रमाणात पाणी वळवले जात असल्याचा आरोप बांगलादेशकडून होत आहे.

  February 18, 2013


लेखसंग्रह

शहिद अफझल गुरूचे मित्र आणि राष्ट्रीय सुरक्षा

Category:

 

पाकिस्तानच्या तालावर नाचणार्‍या हुर्रियत परिषदेच्या नेत्यांना अफजलच्या फाशीचे हत्यार, राज्यात पुन्हा असंतोषाचा वणवा पेटवायला उपयोगी पडेल, असे वाटते. अफजल काही राष्ट्रभक्त नव्हता. तो देशद्रोही होता. पाकिस्तानातल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य होता. संसदेवर हल्ला चढवून मोठ्या नेत्यांचे मुडदे पाडायचा कट त्याने रचलेला होता. पण हुर्रियतवाल्यांना मात्र तो नायक वाटत होता.

  February 18, 2013


लेखसंग्रह

अकबरुद्दीन ओवेसी की बॅरिस्टर जीनाचा पुनर्जन्म ?

Category:

 

हैदराबादमध्ये आमदार असलेले अकबरूद्दीन ओवेसी यांनी आमदार असूनही आपण पाकिस्तानमध्ये असल्याप्रमाणेच वक्तव्ये केली आहेत आणि त्यामुळे भारतातील लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीला धोका निर्माण होईल अशी वक्तव्ये हल्ली सर्रास केली जात आहेत.

  January 10, 2013


लेखसंग्रह

२०१३ मध्ये शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध टिकवणे महत्वाचे

Category:

 

पाकिस्तानातून येणारे सशस्त्र दहशतवादी, बांगलादेशातून मोठय़ा प्रमाणावर होणारी घुसखोरी, नेपाळमधून होणारी ग्राहकोपयोगी वस्तू व बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी, म्यानमार-बांगलादेश, भूतानमधील तळांच्या माध्यमातून उल्फा व इतर दहशतवादी गटांनी भारतामध्ये सुरू ठेवलेल्या कारवाया यामध्ये २०१२ मध्ये मोठी वाढ झाली आहे.

  December 28, 2012


लेखसंग्रह

भोवतालच्या देशांमध्ये चीनची आगेकूच थोपविणे महत्वाचे

Category:

 

गेल्या आठवड्यात मालदीवने मालेच्या “इब्राहिम नसीर आंतरराष्ट्रीय विमानतळा’च्या विकासाचे “जीएमआर’ या भारतीय कंपनीचे कंत्राट रद्द केले.  “जीएमआर इन्फ्रास्ट्रक्‍चर लि.’ कंपनीबरोबर झालेल्या ५१ कोटी १० लाख डॉलरच्या कंत्राटाचे भविष्य मात्र टांगणीला लागले आहे.

  December 20, 2012


लेखसंग्रह

ऑपरेशन एक्स आणि अजमल कसाबला फ़ाशी

Category:

 

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद अमीर अजमल कसाब याला आज फासावर लटकण्यात आले. पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात सकाळी ठीक ७.३० वाजता क्रूरकर्मा कसाबचा “हिशेब” करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांनी कसाबला मृत घोषीत केले.

  November 29, 2012


लेखसंग्रह

नक्षलवादाचे आव्हान: चीनचे भारताशी छुपे युध्द

Category:

 

२४-३०/११/२०१२
पासुन माओवाद्यांच्या “पिपल लिबरेशन गोरिला आर्मिचा रेझिंग सप्ताह” सुरु
झाला आहे. त्या निमित्ताने केंद्रीय गृहखात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे.
स्वामी अग्निवेश यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माओवाद्यांशी वाटाघाटी
करायला तयार आहे

  November 29, 2012