कथा

टूर लिडर गोमु – भाग १ (गोमुच्या गोष्टी – भाग ९)

Category:

 

मी जर तुम्हाला सांगितलं की गोमु टूर लिडर म्हणून एका सुप्रसिध्द ट्रॕव्हेल कंपनीतर्फे युरोपला ४९ जणांना टूरला घेऊन गेला, तर तुमचा तरी विश्वास बसेल कां या बातमीवर ? आणि ती खरीच आहे हे कळल्यावर गोमुचे ग्रहच
त्याच्यावर प्रसन्न झाले असं वाटेल की नाही ?

  March 15, 2022


कथा

पैज (संक्षिप्त रूपांतरीत कथा २)

Category:

 

मूळ कथा – द बेट; लेखक – ॲन्टोन चेकॉव्ह (१८६०-१९०४) : हिंवाळ्यांतील एका मध्यरात्री रावसाहेब आपल्या अभ्यासिकेमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या घालत होते. राहून राहून त्यांना वाटत होते की पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी ती पैज लावायला नको होती. पण आता सुटका नव्हती. ती पंधरा वर्षांपूर्वीची संध्याकाळ व त्यावेळी घडलेल्या गोष्टी रावसाहेबांना अगदी स्पष्ट आठवत होत्या. त्यांनीच दिलेल्या पार्टीत कशावरून तरी चर्चेला विषय आला होता फांशी बरी की आजन्म कारावास बरा. बऱ्याच जणांचे मत होते फाशीची शिक्षा रद्द व्हावी व केवळ आमरण कारावासाची शिक्षाच ठेवावी.

  March 13, 2022


कथा

गोमु वजन कमी करतो (गोमुच्या गोष्टी – भाग ८ )

Category:

 

खरं तर ह्या वजनाच्या तिकीटावरील भविष्यावर विश्वास ठेवणं आणि मैना आणि कार्ड समोर घेऊन बसणाऱ्याने सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवणं सारखचं आहे. नेहमीच घडू शकणाऱ्या घटनांबद्दल अंदाजपंचे दोन वाक्य लिहायची की ते भविष्य खरं होण्याचे चान्सेस वाढतात.

  March 12, 2022


कथा

गोमुची मावशी (गोमुच्या गोष्टी -भाग ७)

Category:

 

मुंबईत वर्षानुवर्षे रहाणाऱ्यांना मुंबईत पहाण्यासारख्या कांही प्रेक्षणीय साईटस आहेत याचा पत्ताच नसतो. त्याचं बरेचसे आयुष्य लोकल प्रवासातच जातं. तो लोकलची स्टेशन पाठ म्हणून दाखवू शकतो पण प्रेक्षणीय स्थळाची कल्पना चौपाटीच्या पुढे जात नाही.

  March 10, 2022


कथा

मॉडेल करोडपती (संक्षिप्त रूपांतरीत कथा १)

Category:

 

मूळ कथा-मॉडेल मिलियोनेर. लेखक – ॲास्कर वाईल्ड (१८५४-१९००). या कथेचे संक्षिप्त भाषांतर केले आहे श्री अरविंद खानोलकर यांनी. इंग्रजीतील अनेक उत्कृष्ट कथांना मराठीत भाषांतरित करुन त्या संक्षिप्त स्वरुपात मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम.

  March 9, 2022


कथा

गोमुची उधारी (गोमुच्या गोष्टी – भाग ६)

Category:

 

सर्वांची उधार देण्याची मर्यादा संपली की गोमु एखादी तात्पुरती नोकरी शोधी. पैसे हातात आले की बरीचशी उधारी फेडून टाकी आणि परत उधार घ्यायला मोकळा होई. उधारी करणे हे आपण मराठी माणसे कमीपणाच कां मानतो कुणास ठाऊक! तसं तर म्हणतात की मानव अथवा त्याचा आत्मा हे शरीर निसर्गाकडून उधारच घेतो आणि जातांना परत निसर्गांतच सोडून जातो.

  March 8, 2022


कथा

गोमुचा डीसकाउंटेड स्मार्टफोन (गोमुच्या गोष्टी – भाग ३)

Category:

 

मी ऐकलं होतं की स्मार्टफोनवर बरीच ॲप्स डाऊनलोड करून घ्यावी लागतात. मग ती वापरतां येतात. पण त्यासाठी मला फोनवर कुठेच इंटरनेट सांपडेना. खूप खटपट केली. पण फोनवर ठराविक तीच चित्रं वगैरे दिसायची. टच फोन होता. पण वारंवार टचटच करूनही कांही त्या मोबाईलला दया येत नव्हती.

  March 3, 2022


कथा

शेअर बाजारात उडी (गोमुच्या गोष्टी – भाग २)

Category:

 

पाच सहा दिवसांनी सुरेश मेहता मला शोधत आला. गोमु माझ्याबरोबरच होता. सुरेशला कसा चुकवतां येईल ह्याचा मी विचार करत होतो. त्याला न सांगता त्याच्या पाहुण्याशी व्यवहार केला होता, त्यामुळे किंचित अपराधीपण वाटत होतं. पण सुरेश सरळ आमच्याकडेच आला.

  February 27, 2022


कथा

कम्पॅनियन गोमु (गोमुच्या गोष्टी- भाग १)

Category:

 

रविवारी गोमु बावाजीला खुर्चीवरून बागेंत म्हणजे सीबीडीच्या मॅंगो गार्डनमध्ये घेऊन गेला होता. तो अगदी काळजीपूर्वक खुर्ची ढकलत होता. अचानक बागेंत त्याला शकु दिसली. ती “अभ्यंकरांची शकु” अशी ओळख गोमुने मला दिली पण त्याआधीच मला ती आठवली होती. आधी आमच्या शाळेत आणि मग माझ्या कॉलेजमध्ये ब्यूटी क्वीन होती. मी आणि गोमु बालपणापासून तिला ओळखायचो. ती दिसल्यावर गोमुचं भान हरपणं साहाजिक होतं. तिच्याशी बोलतां बोलतां तो बावाजीलाच काय पण खुर्चीलाही विसरला.

  February 25, 2022