गोमु आणि परी (गोमुच्या गोष्टी – क्रमांक १९)
Category:
कथा साहित्य - ललित
April 12, 2022
Category:
कथा साहित्य - ललित
April 12, 2022
Category:
कथा साहित्य - ललितचार्लस डीकन्स हा व्हीक्टोरीयन काळांतील सर्वांत सुप्रसिध्द लेखक. त्याचे लिखाण आजही वाचले जाते. आजही शालेय/महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्याच्या वाङमयाचा समावेश असतोच. त्याला स्वतःला मात्र जास्त शिक्षण घेतां आलं नव्हतं. त्याच्या अनेक कादंबऱ्या, कथा आणि एखाद-दोन नाटके प्रसिध्द झाली. त्याचे बरेच लिखाण प्रथम साप्ताहिक किंवा इतर नियतकालिकांमधून मालिका स्वरूपांत प्रसिध्द झालं. सामाजिक विषयांवर लिहिणारा लेखक म्हणून तो गाजला. अनेक कृतींचे चित्रपटांत रूपांतर झाले. पिकवीक पेपर्स, टेल आॕफ टू सिटीज, डेव्हिड कॉपरफील्ड, आॕलीव्हर ट्वीस्ट, ग्रेट एक्स्पेक्टेशन्स आणि वरील कादंबरी ख्रिसमस कॕरोल ह्या कांही त्याच्या प्रसिध्द साहित्यकृती. ख्रिसमस कॕरोल ही कादंबरी सर्वांत प्रसिध्द कृती म्हणावी लागेल. त्यांत स्क्रूजच्या माध्यमातून दिलेला संदेश फारच महत्त्वाचा आहे. कादंबरी अर्थातच मोठी आहे. परंतु ख्रिसमस आलेला असल्यामुळे ती कथेच्या स्वरूपांत मी आपल्यापुढे सादर केली आहे.
April 10, 2022
Category:
कथा साहित्य - ललितगोमुला दोन महिने हॉटेलचं काम चालू असतांना आणि नंतरच्या एक महिन्याचा पगार व नफ्याचा भाग मिळाला. आजवर गोमु आम्हां सर्व मित्रांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून पार्टी द्यायला लावत असे.
April 9, 2022
Category:
साहित्य - ललितगोमुने किती प्रकारची काम केली, याचं कांही रेकॉर्ड ठेवलं नाही.
असं रेकॉर्ड ठेवलं असतं तर गोमुचं नांव गिनेस बुकमध्ये टाकावं लागलं असतं.
कधी कधी तात्पुरतं यश मिळालं म्हणा किंवा थोडे पैसे हातात आले पण त्याच्या मनासारखं काम अजून झालंच नव्हतं.
गोमुला स्वत:चा कांही बिझिनेस करायचा होता.
April 7, 2022
Category:
कथा साहित्य - ललितगोमुने किती प्रकारची काम केली, याचं कांही रेकॉर्ड ठेवलं नाही.
असं रेकॉर्ड ठेवलं असतं तर गोमुचं नांव गिनेस बुकमध्ये टाकावं लागलं असतं.
कधी कधी तात्पुरतं यश मिळालं म्हणा किंवा थोडे पैसे हातात आले पण त्याच्या मनासारखं काम अजून झालंच नव्हतं.
गोमुला स्वत:चा कांही बिझिनेस करायचा होता.
April 7, 2022
Category:
कथा साहित्य - ललित
April 7, 2022
Category:
कथा साहित्य - ललितएच. जी. वेल्स हे वैज्ञानिक वाडमय लिहिणारे लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. टाईम मशीन ही त्यांची कादंबरी खूप गाजली. तिच्या कल्पनेवर चित्रपट निर्माण झाले. इनव्हीजिबल मॅन ही देखील तितकीच गाजलेली कादंबरी. ‘फर्स्ट मेन ऑन द मून’ आणि इतर वैज्ञानिक कथांमधून त्यांनी जणू कांही भविष्याचा वेधच घेतला. त्यांनी कल्पिलेल्या अनेक गोष्टी पुढे वास्तवांत आल्या. त्यांनी जगाचा इतिहासही लिहिला आणि आदर्श जग कसं असावं ह्याच्या कल्पनाही कथा कादंबऱ्यांतून मांडल्या. त्यांच्या अनेक कथाही लोकप्रिय झाल्या. ब्लाईंड मॅन, व्हॅली ऑफ स्पायडर, इ. कथांमधे कल्पना विलास तर आहेच पण बरोबरच शिकवण पण आहे. मॅजिक शॉप ही त्यांची जरा वेगळीच कथा. ह्या कथेत तर्कसंगत विचार करू पहाणाऱ्या बापाचा जादूवरला अविश्वास किंवा जादू म्हणजे युक्ती असे मत आणि त्याच्या लहान मुलाचा जादूवरला संपूर्ण विश्वास ह्या विरोधाभासावर कथा आधारीत आहे. बापाला आलेला अनुभव तर्कसंगत वाटत नाही. तो अजूनही त्यावर विश्वास ठेवू इच्छित नाही. त्याच्या तर्कनिष्ठेला धक्का तर बसलाय पण ते त्याला गैर वाटतय. मुलगा तेच सत्य म्हणून सहज स्वीकारतो. जेवढं आणि जसं आपण पहातो तसंच दुसरा पहात नाही. त्याची जाणीव वेगळ्या पातळीवरची असू शकते. ह्यात योग्य, अयोग्य कांही नाही.
पण आपली जाणीवच खरी व दुसऱ्याची चुकीची असा दुराग्रह असू नये. गोष्टीत जादूकडे वेगळ्या दृष्टीने पहाणारा लहान मुलगा त्याचाच असतो, म्हणून तो ते सहज स्वीकारतो, इतकेच.
April 6, 2022
Category:
कथा साहित्य - ललितकथेचा मथळा वाचून तुम्हांला नक्कीच माझा राग आला असेल. पण लक्षांत घ्या की मी ह्या गोष्टींमध्ये गोमुच्या बाबतींत घडलेल्या खऱ्या गोष्टींची नोंद करतोय. प्रकाश कलबाडकर हा पत्रकार म्हणून लिहितांना एखाद्या चार आण्याच्या बातमीला बारा आण्याचा मसाला लावतांना दिसेल. कधीतरी संपादकांना खूष ठेवण्यासाठी न घडलेली बातमीही देईल.
April 5, 2022
Category:
कथा साहित्य - ललितहॉर्स डीलर्स डॉटर ही जरी लघुकथा असली तरी ती ६५५० शब्दांची आहे. (मी रूपांतर २२४५ शब्दांत केलं आहे). औद्योगीकरणाच्या लाटेत अनेकांचे व्यापार बसले. तसा ह्या कुटुंबप्रमुखाचाही धंदा बसला. नंतर तो मरण पावला. धडधाकट पण कुचकामी तीन मुलगे आणि हिंमत न हरतां कृतीशील रहाणारी मुलगी शेवटी दारिद्र्यांत एकटी पडते, तेव्हां आत्महत्त्येचा निर्णय घेते. योगायोगाने एक तरूण तिला वाचवतो आणि ती त्यालाच जबरदस्तीने प्रेमिक करून त्याचा आधार घेते. तिचे त्याच्यावर प्रेम आहे/होते असा उल्लेखही नाही. स्त्रीची अपरिहार्यता त्यांत अधोरेखित केली आहे. इंटरनेटवर ह्या गोष्टीची अनेक परीक्षणे वाचायला मिळतील. त्यांत “रद्दी” पासून “अत्त्युत्तम” पर्यंतचे सर्व प्रकारचे मूल्यमापन आहे. ही कथा समजायला कठीण आहे. घोडे व्यापा-याशी संबंधित म्हणून अनेक ठीकाणी घोड्यांचा, घोड्यांच्या शरीराचा, हालचालींचे अनेक उल्लेख आणि माणसाचे पशुच्या स्तरावर जगणे ह्याचे उल्लेख आले आहेत. औद्योगीकरणामुळे कुटुंबातील व्यक्तींतला जिव्हाळा संपला आहे, प्रत्येकजण आपल्यापुरता विचार करतो आहे, हे प्राणीसदृश वर्तन दर्शवले आहे. माझ्या रूपांतरीत कथेच्या व्याप्तीत (तरी ती १५००ची मर्यादा सोडून दीडपट झाली आहे) ह्या सर्व गोष्टी तितक्या समर्थपणे दाखवणे कठीण होते. पण मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व कथा तुम्हांला सादर करत आहे.
April 3, 2022
Category:
कथा साहित्य - ललितस्त्री कोणत्या घरांत जन्मली आहे ह्यापेक्षा तिचं सौंदर्य, तिची कोमलता, तिचा कमनीय बांधा, तिची मोहकता, तिचा स्वाभाविक डौलदारपणा, तिचे उत्स्फूर्त विलोभनीय वागणे आणि तिचं चातुर्य ह्या गोष्टी स्त्रीचं योग्यता ठरवतात आणि एखाद्या झोपडीतील मुलीलाही एखाद्या राजकुमारीच्याच पातळीवर आणून ठेवतात.
March 30, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti