साहित्य - ललित

पैली ते सात्वी

Category:

 

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वडीलांकडून आणि आमच्या गुरुजींकडून मी जो मार खाल्लाय, तो मी कधी जन्मात विसरणार नाही. या माराने मला जीवन शिक्षणाचे पहिले धडे दिले. आमच्या मराठी शाळेचे नावच मुळी होते, ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर.’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात फोंडाघाट या गावातली ही प्राथमिक शाळा अख्ख्या पंचक्रोशीत गाजलेली.

  June 19, 2022


लेखसंग्रह

लहाणपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥

Category:

 

बालपणाच्या रम्य आठवणीत रमायला कोणाला आवडणार नाही? मध्यंतरी एका शाळेत आरोग्य तपासणीसाठी जाण्याचा योग आला. तपासणीनंतर प्रश्नोत्तरा – दरम्यान काही उत्साही मुलांनी माझ्याच बालपणाविषयी प्रश्न विचारले तेव्हा मात्र माझे बालपण झरझर माझ्या डोळ्यांपुढे सरकू लागले.

  June 16, 2022


साहित्य - ललित

अनोळखी दिवस

Category:

 

वडील आर्मीत नोकरीला होते. त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत आमचे कॅम्पच्या शाळेत शिक्षण झाले. त्यांची शिस्त अंगी बाणली. ते जिवनच वेगळे होते. त्यामुळे बाहेरच्या जगाची काहीच कल्पना नव्हती.

  June 14, 2022


साहित्य - ललित

रम्य ते बालपण : चंद्रशेखर ओक

Category:

 

लहानपण देगा देवा, मुंगीसाखरेचा रवा’ संत तुकाराम महाराजांनी किती यथार्थपणे म्हटले आहे. खरंच बालपण किती रम्य असतं याची जाणीव आपणास काळाच्या ओघात जात असताना पदोपदी होत असते.

  June 12, 2022


कथा

बाई आली पणात

Category:

 

सुगीचे दिवस आले होते अन् समधी माणसं कशी पटापटा आपल्या कामाला लागली व्हती. शाळूकाढायला आला व्हता. कारडी गहू, हरभऱ्यानी रानं कशी फुलून तरारली व्हती. चिंचोळलीमधी जिकडं तिकडं घाई गडबड चालू व्हती. समधं शेतकरी लई कामात व्हढाचढीनं मरमर मरोस्तवर काम उरकीत व्हती. गावात शिंद्याची आळी विठ्ठल रखमाई दोन्ही हात देवळात कमरेवर ठेवून जणू चिंचोलीची राबणारी कष्टकरी बाई बाप्पे पाहत होती.

  June 11, 2022


कथा

आयुष्य

Category:

 

स्मिता कॉम्प्युटर इंजिनीअर. चार वर्षे झाली विक्रोळीला एका छोट्याशा कंपनीत नोकरीला होती. तिला प्रोग्रॅमिंग व काही क्लाएंटचे प्रोजेक्ट्स बघावे लागत. ती घरातून बारा-साडेबाराला निघे व रात्री बारा साडेबारापर्यंत परत येई. अर्थात तिला कारने घरापर्यंत ड्रॉप असे. पण काल रात्री तिला अजिबात झोप आली नाही.

  June 9, 2022


लेखसंग्रह

अजाणतेपणातील वांडपणा

Category:

 

माझा अजाणतेपणाचा काळ सुखाचा होता की दु:खाचा याचा जमाखर्च मला नाही मांडता यायचा. पुन्हा सुख-दुःखाचे निकष व्यक्तिसापेक्ष आणि आपल्या भावनांचा कस कुणी ऐरणीवर घासून तपासतो का?

  June 8, 2022


कथा

भटकंतीतील भुतनी

Category:

 

अखेर मायावतीच्या कड्यावर मला एकट्यालाच जावं लागणार हे निश्चित आहे. नेहमीप्रमाणे सहा महिने आधी सांगूनही इतरांनी काही ना काही सबबी सांगून माघार घेतली. हीच मंडळी नेहमी मी कुठे जाऊन आलो की, ‘अरे, आधी बोलला असतास आम्ही बरोबर आलो असतो,’ असे म्हणणार आणि तिकीटे बुक करायची वेळ आली की सबबी पुढे करणार हे ठरलेले. खरं तर इतक्या वर्षांचा अनुभव लक्षात घेता मला या गोष्टीची सवय व्हायला हवी होती तरीही प्रत्येक वेळी मनाचा चडफडाट व्हायचा तो झालाच!

  June 7, 2022


लेखसंग्रह

मी असा का? – महेश झगडे, I.A.S

Category:

 

मी प्रशासनात चौतीस वर्षे ज्या पद्धतीने वागलो तो तसा का वागलो याचे उत्तर खाजगी कंपनीत घडलेल्या दोन घटनांमध्ये दडले आहे. त्यामध्ये अवैध गोष्टींची मनस्वी चीड, स्पष्टवक्तेपणा, पैशापेक्षा बौद्धिक समाधानाकडे कल आणि प्रत्येक गोष्टीत खोलवर जावून परिपक्व विचार करण्याची सवय. मला अनेक वेळेस अनेक लोक विचारतात की मी माझ्या प्रशासन कारकिर्दीत असा का वागलो, त्याचे हे एक छोटे विवेचन.

  June 6, 2022


साहित्य - ललित

सूर्यास्त

Category:

 

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आल्यावर माणसाला निवांतपणा मिळतो. मग जरा मागे वळून बघावसं वाटतं आणि तेव्हा हळूहळू सुरवातीचा काळ आठवतो. आयुष्याची परंपरागत विभागणी चार भागात आश्रमात केली आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. तशीच ही सुद्धा एक व्यवस्था आहे. बालपण, किशोरवय, प्रौढपण आणि मग हळूहळू म्हातारपण.

  June 5, 2022