अवर्गिकृत

“जोखीम”

Category:

 

आज संयोगिताची एका डोळा हसू आणि एका डोळा आसू अशी अवस्था होती. आज तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचं, मनूचं म्हणजेच मनस्वी सावंतचं लग्न होतं. मोठी मोठी मंडळी आली होती लग्नाला. लग्न पण मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं. तिची मनस्वी आज सावंत नाव मागे सोडून सौ. मनस्वी शार्दुल भोसले होणार होती आणि त्याचा संयोगिताला खूप अभिमान होता.

  December 14, 2022


कथा

गोष्ट छोटी – दोन आज्यांची!

Category:

 

एक आजी , आईची आई . शिक्षण जेमतेम दुसरी तिसरी. तिच्या उमेदीच्या काळात तिने खूप कष्ट केले. त्यावेळी बहुतेक एकत्र कुटुंबात सगळ्या स्त्रियांना करावे लागत. ती माझ्या आठवणीत असल्या पासून दमा वगैरे असल्यामुळे असेल जास्त बाहेर जायची नाही. पण बसल्या जागी कुठे काय चाललय तिला पक्क ठाऊक असायचं. कारण छान नऊवारी साडी नेसणारी ती अगदी पोलीस फाईल मध्ये दाखवतात त्या पद्धतीने दोन-चार लोकांशी एकाच गोष्टीविषयी गप्पा मारून त्यांच्या नकळत तिला हवी ती माहिती बरोबर काढून घ्यायची. इतकी चाणाक्ष !

  December 13, 2022


अवर्गिकृत

अमेरिका – ३० डॉलरच्या कटींगची कथा

Category:

 

अमेरिकेत सुनेबरोबर नातीचे (दियाचे) केस कापायला (पक्षी: trim करयला) एका केश कर्तनालयात गेलो. स्पेशली लहान मुलांसाठी असलेल्या AC केश कर्तनालयात प्रवेश केला आणि मन गहिवरून गेले. काय थाट होता म्हणून सांगू. दुकानाचा संपूर्ण अँम्बीयन्स एखाद्या नर्सरी स्कूल सारखा होता. जागोजागी कार्टून्स लावलेली. Q असेल तर मन रिझवण्यासाठी खेळणी. मुलांची गाणी आणि कायकाय होते. दियासाठी सकाळी ११ची अपॉइंटमेंट दिली होती.

  December 13, 2022


आठवतो का काळ ही भावनो
नॉस्टॅल्जिया

आठवतो का काळ ही भावनो

Category:

 

आठवतो का काळ ही भावनो? काय काळ होता राव तो पहाटे पासून गाणी लावायला सुरवात होयची ती रात्री पर्यंत गाणी असायची ,

  December 5, 2022


कथा

कॅफे डेस्टिनी

Category:

 

एका मॅट्रिमोनिअल साईटवर दोन दिवस चॅटिंग केल्यानंतर निकिता आणि निखिल दोघे रविवारी संध्याकाळी हॉटेल कॅफे डेस्टिनीला भेटायचे ठरवतात. ठरल्याप्रमाणे निखिल निकिताला भेटण्यासाठी त्याचा मित्र निहारला सोबत घेऊन आणि निकिता तिची मैत्रीण नेहाला सोबत घेऊन येते. चौघांचे हाय – हॅलो झाल्यावर निखिल आणि निकिता हॉटेलच्या वरच्या फ्लोअरवर एकमेकांशी बोलण्यासाठी जातात आणि निहार आणि निकिता तिथेच एका टेबलवर बसून कॉफी ऑर्डर करतात.

  November 23, 2022


कथा

परिस्थिती

Category:

 

आज पाच वर्षांनी ती पुन्हा त्याला बसस्टॉपवर दिसली. गळ्यातील मंगळसूत्रावरून कळत होतं की तिचं लग्न झालंय. पाच वर्षानंतरसुद्धा ती तितकीच सुंदर दिसत होती. तिच्याशी बोलण्यासाठी तो तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो, “ओळखलंस?” त्याला पाहताच तिचे मन पुन्हा पाच वर्ष मागे जाते. काही वेळ तसंच त्याला बघितल्यानंतर ती म्हणते, “हो, न ओळखायला काय झालं” तिचे हे उत्तर ऐकून तो तिला म्हणतो, “पण त्यावेळेस मी तुला ओळखण्यात चूक केली प्रतीक्षा . मला वाटलं नव्हतं की तू मला प्रेमाची स्वप्नं दाखवून दुसऱ्याच मुलाबरोबर पळून जाऊन सुखाचा संसार थाटशील. काय कमी होती माझ्यात? का माझ्या प्रेमाचा असा अपमान केलास? मी असं काय चुकीचं वागलो होतो प्रतीक्षा, ज्याची तू मला इतकी मोठी शिक्षा दिलीस?

  November 22, 2022