काळा पैसा पुन्हा प्रकाश झोतात
Category:
अवर्गिकृतकाही दिवसांपासून स्वीस बँकांमधील काही भारतीयांच्या काळ्या पैशांचा मुद्दा चर्चेत आहे. या भारतीय खातेदारांची यादी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे आली असून ती प्रसिद्ध करून दोषींवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी विरोधी पक्ष करतआहेत. पण, असे केल्यास काँग्रेस पक्ष अडचणीत येऊ शकत असल्यामुळे गोपनीयतेच्या कायद्याचा आधार घेऊन पंतप्रधान हीयादी जाहीर करणे टाळत आहेत.