व्यक्ती-परिचय

मिनार पिंपळे

Category:

 

मिनार पिंपळे यांनी त्यांच बी. एस. डब्ल्यू. व एम. एस. डब्ल्यू चं शिक्षण चर्चगेटमधील निर्मला निकेतन या कॉलेजमध्ये पुर्ण केलं. लहानपणापासूनच त्यांना झोपडपट्यांमधील रहिवाश्यांसाठी काहीतरी भव्य, चांगले काम करण्याची मनी प्रचंड हुरहूर होती. पदव्योत्तर शिक्षण झाल्यानंतर त्यांनी युवा या संघटनेची स्थापना केली. मुंबईमधील झोपडपट्टयांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपाय योजना सुचवल्या व प्रत्यक्ष अंमलात सुध्दा आणल्या. परंतु या योजना अंमलात आणण्यासाठी त्यांनी स्थानिक बेरोजगार तरूणांची मदत घेतली. त्यांच्याशी जिव्हाळ्याच नात निर्माण करून त्यांना संघटित केलं. आज त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व इतक्या वर्षांच्या साधनेमुळे आज अनेक झोपडपट्टयांमध्ये धडाडीच्या तरूणांची पथके उभी राहिली आहेत. हे तरूण स्वतःच या वस्त्यांच्या विकासासाठी अनेक उपाय योजना राबवीत आहेत. त्यांच्या बाहुंना बळ व पाठीला कणा देण्याचे काम मात्र युवाचे स्वयंसेवक करीत आहेत. अनेक तरूणांना गुन्हेगारी मार्गांपासून परावृत्त करून समाजाच्या आदर्श पुर्नरचनेसाठी त्यांना मानसिक व शारिरीक खाद्य पुरविण्यात या संघटनेचा मोलाचा वाटा आहे

व्यक्ती-परिचय

संजीवनी बीडकर

Category:

 

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आपल्या कलेच्या जोरावर मुंबईसारख्या कलेची पंढरी मानल्या जाणार्‍या मयानगरीच्या मुख्य प्रवाहात येणे, वाटते तितके सोपे नसते. अनेक कलावंतांचे ते केवळ स्वप्नच ठरले आहे. पण अनेक कलावंत आपले कर्तृत्व व नशीब यांच्या तारा जोडून तिथवर पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत व मग कय विचारता त्यांच्या संपुर्ण आयुष्याचेच तिथे सुंदर व सुरमय असे गाणे झाले आहे.

अशा कलावंतांमध्ये बीडच्या संजीवनी बीडकर होत्या. त्यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले होते. परंतु त्यांच्याकडे अतिशय अप्रतिम व साक्षात नटराजाचे पृथ्वीवरील दर्शन घडविणारी अशी नृत्यकला होती. व्यक्तिमत्त्व आकर्षक होते.

व्यक्ती-परिचय

नीलेश चव्हाण

Category:

 

नाशिकच्या राजकीय क्षितीजावर ज्या झपाट्याने नीलेश चव्हाण हे नाव उदयास आले तितक्यात वेगाने हा उमदा तरुण जीवनपटावरून अस्तंगत होईल, याची कुणी कल्पनाही केली नसावी.

व्यक्ती-परिचय

दादासाहेब लिमये

Category:

 

बडबड नको कृती हवी’ ही म्हण तर आपल्या सर्वांना परिचीत आहेच. परंतु ही म्हण दुरदूरच्या आदिवासी पाड्यांच्या नसानसांत भिनवून, व शिक्षणाचे सार्मथ्यशाली वारे खेड्यापाड्यांमधील आदिवासी लोकांपर्यंत पोहचवून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे असामान्य कार्य तपस्वी केशव गोविंद तथा दादासाहेब लिमये यांनी पाली येथे केले.

व्यक्ती-परिचय

दादाजी खोब्रागडे

Category:

 

घरी अठराविश्वे दारिद्य असलेल्या दादाजी खोब्रागडे या कृषी संशोधकाने अवघ्या दीड एकर शेतीत तांदळाची तब्बल नऊ वाणे विकसित केली आहेत. त्यांच्या या संशोधनाकडे राज्य सरकारने पाठ फिरवली असली तरी जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने या कृषी संशोधकाची दखल घेतली आहे. फोर्ब्सने जगभरातील ग्रामीण उद्योजकांची एक यादी प्रसिद्ध केली आहे, त्यात चंदपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या गावात राहणार्‍या दादाजी खोब्रागडे यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.

व्यक्ती-परिचय

गंगुबाई वर्धने

Category:

 

लोकसेवा व विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कस्तुरबा गांधी पुरस्कार यंदा गंगूबाई वर्धने यांना जाहीर झाला आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीतून मार्ग काढणारी तेजस्वी प्रकाश शलाका म्हणजे गंगूबाई वर्धने, अशी त्यांची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी हे त्यांचे जन्मगाव. वयाच्या तिसर्‍या वर्षी वडिलांचे व नवव्या वर्षी आईचे निधन झाल्यावर अंगावर गरिबीची कुर्‍हाड कोसळुनसुध्दा गंगूबाईंनी अतिशय धैर्याने व स्वत:च्या पायावर उभे राहून बहीण-भावांचा सांभाळ केला.

व्यक्ती-परिचय

प्रा. डॉ. मधुकर केशव ढवळीकर

Category:

 

पुरातत्त्व शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी पितामह असलेले प्रा. डॉ. मधुकर केशव
ढवळीकर यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.

प्रा. ढवळीकर यांचा जन्म १९३०चा. त्या काळात पुरातत्त्वशास्त्र अगदीच दुर्लक्षित होते. अर्थात आजही त्याबाबत सरकारी पातळीवर उदासीनता आहेच. त्यामुळे पदवी-शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये १९५३ पासून टेक्निकल असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात करून ढवळीकर यांना वेगळी दिशा पकडली. प्रा. ढवळीकर यांची अभ्यास, चिकाटी आणि विषयाचा चारी बाजूंनी विचार करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या शास्त्राच्या संशोधनात मूलभूत स्वरूपाचे कार्य केले.

व्यक्ती-परिचय

डॉ. तारा भवाळकर

Category:

 

लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांचं वर्णन ‘माय’वाटेवरची प्रवासिनी असंच करावं लागेल. कारण ‘लोकसंस्कृती’ ही व्यापक अर्थाने ‘माय’ म्हणजेच ‘मातृपरंपरा’ असल्याचं त्यांनी आपल्या लेखनातून वारंवार सिद्ध केलं आहे. ताराबाईंचं आजवरचं लोकसाहित्यविषयक लेखन वाचल्यावर महाराष्ट्रीय किंवा एकूणच भारतीय स्त्रीमन नव्यानं उलगडतं. बाईंनी लोकसाहित्याचे संशोधन करताना संकलित केलेल्या लोकगीत-लोककथांचा अन्वय लावून त्यांनी या सार्‍यांची सैध्दंतिक मांडणी करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच त्यांना मिळालेली ‘महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळा’ची सन्मानवृत्ती योग्यच आहे.

व्यक्ती-परिचय

लक्ष्मीकांत देशमुख

Category:

 

दोन वर्षांपूर्वी लक्ष्मीकांत देशमुख यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून ज्यावेळी नेमणूक झाली, त्यावेळी जिल्ह्यातल्या
स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण कमालीचं वाढलं होतं. साहित्याची जाण असलेला, संवेदनशील प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याला लाभल्याने सामाजिक विषयांमध्ये त्यांना रस असणार हे स्पष्ट होतं. कारभार हाती आल्यावर देशमुखांनी कामही जोरकसपणे सुरू केलं. त्यांनी निग्रह केला तो जिल्ह्यातली स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा. त्यावेळी कोल्हापूरची स्त्री-पुरुष सरासरी होती हजारांला अवघी ८३९. त्यासाठी देशमुखांनी पहिलं कॅम्पेन जाहीर केलं ते ‘सेव्ह द बेबी गर्ल’ अर्थात ‘लेक लाडकी’. त्यासाठी त्यांनी खास वेबसाइट सुरू केली. पुढच्या दीड महिन्यांत जिल्ह्यातली सर्व सोनोग्राफी सेंटर्स ऑनलाइन जोडली गेली. पहिल्यांदा अनेक डॉक्टरांनी याला विरोध केला. परंतु अनेक बैठका घेतल्यानंतर हा विरोध मावळला. सर्व सेंटर्सना त्यांनी केलेल्या सोनोग्राफींची माहिती नोंदीच्या स्वरूपात साठवण बंधनकारक करण्यात आलं. त्यामुळे सोनोग्राफीचा संपूर्ण जिल्ह्यातला दोन हजारांचा आकडा वाढून ११ हजारांवर गेला. कोणतं सेंटर सोनोग्राफी करतं, का करतं हे थेट प्रशासनाला कळू लागलं.