संधीचं सोन! – Part 3
Category:
साहित्य - ललित‘अहो, असं काय करताय? दोघी सकाळीच नाही का गेल्या फेशियलसाठी ब्यूटिपार्लरमधे? आपण खूप साधेपणाने करायचं ठरवलं पण पोरींना वाटतं थोडी हौसमौज करावी.’ तेवढ्यात एक माणूस दोन मोठे डबे, पेपर डिशेस, ग्लास, अर्धा डझन बिसलेरीच्या बाटल्या घेऊन येतो. म्हणतो, ‘बाळाभाऊंनी पाठवलंय. जेवण करून घ्या. मी उद्या सकाळी येऊन डबे घेऊन जाईन.’ एवढे म्हणून तो गेला सुद्धा. डबे आल्याचे पहाताच राधाक्कांची खात्री पटली. मग त्यांनी भजनी मंडळाच्या बायांना फोन करून निरोप दिले. शेजारच्यांनाही निरोप गेले, तेवढ्यात तायडी आणि बबडी आल्याच.
March 18, 2022