कथा

स्मरणगाथा : ४ 

Category:

 

पुस्तक पर्यावरण विषयावरचं होतं .

पण गोष्टीवेल्हाळ भाषा , अवतीभवतीच्या खोडकर , शंकेखोर आणि एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या मुलांचे यथार्थ वास्तववादी चित्रण त्यातून उमलत जाणारी , औत्सुक्यपूर्ण कथा , मनोरंजनाबरोबर मुलांच्या पर्यावरणीय जाणिवांचा मांडलेला विचार आणि कुतूहल वाढवणारी आशयघन लेखनशैली !
मुलांना आकर्षित करणारं मुखपृष्ठ .

  August 13, 2025


कथा

विमर्श कथा : ५

Category:

 

खेळण्यातला लाकडी ट्रक घेऊन धावत येणाऱ्या सावलीला बघून बाबा थांबला . डोक्यावरचे मक्याच्या कणसांचे पोते खाली ठेवले आणि घाम पुसत उभा राहिला . सावलीने त्या पोत्यातली तीन कणसे ट्रकमध्ये ठेवली आणि दोरीने बांधलेला ट्रक घेऊन ती निघाली . बाबा तिथेच थांबलेला बघून तिने कमरेवर हात ठेवले आणि ठसक्यात म्हणाली , ” दमतोस ना म्हणून म्हणते एकट्याने काम करू नको , आता मी करते मदत . तू ये हळूहळू. “

  June 30, 2025


कथा

शंभरी काश्या

Category:

 

इतिहासाने ज्यांना दीर्घकाळ उपेक्षीत ठेवलं ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छावा संभाजी महाराजांना ‘तह’ कधीच मान्य नव्हता. ७०च्या दशकात त्या संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत सुंदररित्या वठवून त्या अनभिषिक्त राजाला न्याय देण्याचा काम ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्यातून केले ते म्हणजे मराठी रंगभूमीवरचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर. घाणेकरांना सुद्धा तडजोड, लाचारी मान्य नव्हतीच. म्हणून ज्या नाटकाने त्यांना मराठी व्यावसायिक रंगभूमीवर एक वेगळी प्रतिष्ठा आणि ओळख निर्माण करून दिली ते प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या अवघ्या १०० प्रयोगांच्या ‘घोडदौडी’नंतर घाणेकरांनी ते नाटक सोडून दिले. कारण त्यांना खाजगी सुपाऱ्या पटत नसे आणि त्यामुळे दि गोवा हिंदू असोसिएशन्सशी मतभेद झाल्यामुले डॉक्टरांनी ‘रायगड’ला राम राम ठोकले.असे कलंदर व्यक्तिमत्व आणि बेधडक स्वभाव असलेले नट क्वचितच पाहायला मिळतात.

  February 5, 2025


साहित्य - ललित

मेरिट

Category:

 

पण गीता ला मात्र अश्या प्रसंगांची अगदी लहानपणा पासूनच सवय होती , नीता आणि गीता या सुलभा ताई आणि श्रीधर राव यांच्या संसार वेलीवर दोन वर्षांच्या अंतराने उमललेल्या कळ्या..पण आत्ता पर्यंतच्या आयुष्यात नियतीचे फासे मात्र दोघींसाठी काही एकसारखे पडले नव्हते , नीता मोठी म्हणून लाडाची या न्यायाने प्रत्येक गोष्ट तिला न मागता विनासायास … मिळत गेली , नवीन सायकल असो वा कपडे किंवा वह्या पुस्तकं नीताला सगळं नवीन मिळायच , आणि ” चांगलेच तर आहेत की , कुठं खराब झालेत ? ” अश्या पालुपदांनी मात्र नीताचे वापरून झालेले कपडे व पुस्तकं गीताच्या वाट्याला यायची , आणि ती ही सगळं हसतमुखाने , विना तक्रार स्वीकारायची .

  December 5, 2024


शहरे आणि गावे

अश्मयुगीन वसाहतीचे पितळखोरा

Category:

 

औरंगाबाद जिल्ह्यात आणि चाळीसगाव तालुक्यात विभागल्या गेलेल्या पितळखोरा येथे अश्मयुगापासूनच्या वसाहतीचे अवशेष आढळले आहेत.

  November 28, 2024


शहरे आणि गावे

अष्टदशभुज गणेश, रामटेक

Category:

 

भगवान रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक शहरात पुरातन अष्टदशभुज गणेश मंदिर आहे. हे मंदिर ११-१२ व्या शतकातील असल्याची नोंद असून १८ हात असलेली ही एकमेव मूर्ती आहे.

  November 28, 2024


साहित्य - ललित

विश लिस्ट

Category:

 

मध्ये मध्ये बाकीच्या नर्स, वॉर्ड बॉय यांना सूचना देत होत्या, पेशंटस् ची विचारपूस करीत होत्या …! आणि मग चार वाजल्या पासूनच ..त्या खास वॉर्ड मध्ये सजावट सुरू झाली, फुगे …रिबिनी लावण्यात आल्या काही उत्साही मंडळींनी बर्थ डे पार्टीच्या त्रिकोणी टोप्या आणल्या होत्या … कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी निकराची लढाई करणाऱ्या या सगळ्या वीरांच्या… नेहमी सुतकी आणि गंभीर वातावरण असलेल्या या ” कॅन्सर वॉर्ड” मध्ये आज वेगळंच चैतन्य निर्माण झालं होतं, एक निराळा उत्साह जाणवत होता ..आणि त्याचं कारण ही सर्वांना ठाऊक होतं. वयाने सर्वात ज्येष्ठ, पण मनाने चिरतरुण असलेल्या सदा हसतमुख.. अंजली ने ‘ लाफिंग बुद्ध ‘ असं नाव पाडलेल्या ” मनोहर काकांचा ” वाढदिवस !! पाच वाजता तर तिथला उत्साह, ते चैतन्य अगदी शिगेला पोहोचलं होतं..

  November 28, 2024


कथा

घुस…

Category:

 

कदाचित माझा प्रवास हिंसेकडून अहिंसेकडून सुरु झालेला आहे कदाचित तो तेंव्हाच सुरु झाला होता जेंव्हा वीस वर्षापुर्वी मी मांसाहार सोडून शाकाहारी झालो होतो…

  November 25, 2024


साहित्य - ललित

बोनस

Category:

 

मधल्या सुटीची घंटा वाजली तसं चौघे म्हणजे रोहन, मनोज, अजित आणि दीपक म्हणजेच दिपू… वर्गातून पळत सुटले ते सायकल स्टँड कडे …. त्या पैकी रोहन ला दोन दिवसा पूर्वीच त्याच्या वाढदिवसाची भेट म्हणून नवीन सायकल मिळाली होती…आणि ती सायकल पाहण्यासाठी हे बाकीचे तिघे उत्सुक होते… आणि खरोखरच भानामती झाल्या प्रमाणे हे तिघे रोहनची नवीन सायकल पहात होते.. एटलास कंपनीची ….लाल चुटुक रंगाची सायकल, ” च्यायला काय भारी आहे रे सायकल? ” …. ” कितीला पडली? ” …आणि ” हे वायरचे ब्रेक आहेत का? ? ” अश्या उद्गारांसहित तिघे सायकल न्याहाळू लागले. ..सायकल ही फक्त काळया रंगाचीच असते … लोखंडी …अवजड !! अशी समजूत असल्याने .. ही नवीन सायकल म्हणजे या तीघां च्या दृष्टीने ” अद्भुत ” होती ..आणि सायकलचं कौतुक ऐकुन रोहन च्या अंगावर मात्र मुठभर मास चढत होतं… ” साडे सातशे ची आहे सायकल, नवीनच मॉडेल आलंय हे …” रोहन ने छाती बाहेर काढत उत्तर दिलं..

  November 24, 2024