लेखसंग्रह

मराठी भाषेचा नाट्यप्रवास’ – रायपूर !

Category:

 

मार्च २३- माझे रायपूरला “मराठी भाषेचा नाटयप्रवास ” या विषयावर व्याख्यान झाले. संयोजक होते – महाराष्ट्र मंडळ ! १९३५ पासून कार्यरत असलेले आणि मराठी मातीपासून दूर रुजलेले हे बी आता फोफावले आहे. त्यांचे वर्षभर अनेकविध उपक्रम सुरु असतात. मी पूर्वी रायपूरला असताना त्यांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार होतो. आता तर renovation चे प्रचंड काम त्यांनी हाती घेतलेले आहे.

साहित्य - ललित

उपऱ्यांची माती !

Category:

 

मुंबईच काय, महाराष्ट्रातील सर्वच महानगरे आता उपऱ्यांची वसतिस्थाने झालेली आहेत. मला मात्र अजूनही कोणी “पुणेरी किंवा पुणेकर” असं संबोधलं तर आवडत नाही. ताडकन माझा “खान्देशी बाणा ” उफाळून येतो.

साहित्य - ललित

हुंदक्यांचा “ओटीपी” !

Category:

 

अचानक वृत्तपत्रात बाळासाहेब मंगेशकर पुण्यातील सरपोतदारांकडे येणार असल्याचा आणि त्यांच्या गीतांवर आधारीत ” मानसीचा चित्रकार तू ” हा कार्यक्रम असल्याचं दिसलं. मला तो “हुंदक्यांचा ओटीपी (One Time Password) ” हातून गमवायचा नव्हता. आयुष्याची पूर्ण ८० वर्षे आई झालेल्या मोठ्या दीदींच्या निधनानंतर भावगंधर्व पहिल्यांदाच बोलणार होते. ओटीपी काही विशिष्ट वेळेसाठी असतो- त्यादिवशी तो दुपारी ४ ते सायंकाळी ८ पर्यंत व्हॅलिड होता.

साहित्य - ललित

शिवरंजनी

Category:

 

” शिवरंजनी ” हा मुळातच राज कपूर, शंकर -जयकिशन, लता,मुकेश मंडळींचा आवडता राग ! यातल्या रचना भेदक असतात. “संगम ” (१९६४) मधील “ओ मेरे सनम” हे गाणे याच घराण्यातील !

लेखसंग्रह

ताण-तणावांचे विषाणू

Category:

 

ताण-तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण-तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण-तणावांना काही देणे-घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे.

लेखसंग्रह

मेल्टिंग पॉट की सॅलड बाउल ?

Category:

 

….. एकेकाळी यालाच आपण “एकत्र कुटुंबपद्धती ” म्हणत होतो आणि हळूहळू त्या पॉटमधील नातं वितळत गेल्यामुळे (अजूनही माझ्या बघण्यात काही सन्माननीय अपवाद आहेत) आता ती “विभक्त कुटुंब पद्धती” झालीय आणि अविभाज्यपणे जीवनपद्धती म्हणून स्वीकारली गेली आहे. सगळी छोटीछोटी घरे म्हणजे सॅलड बाउल्स !

लेखसंग्रह

दि कश्मीर फाईल्स’ – सत्य ‘खरं’ असतं !

Category:

 

“इंफोटेंमेंट” सदरातील चित्रकृतीने त्या चौकटीबाहेर जाऊन समोर धरलेला आरसा विद्रुप आणि असह्य होता. मल्टिप्लेक्सच्या थंडगार अंधारात हे साधं बघणंही अस्वस्थ करणारं होतं आणि बजाज स्कुटर /गॅस सिलेंडर मुळे वैतागणाऱ्या मला त्या मंडळींच्या जागी स्वतःला इमॅजिन करणेही अशक्य होतं.

लेखसंग्रह

विचार वेध

Category:

 

विचारांचा वेध घेण्याची सवय असायला हवी त्यातून नीरक्षीरविवेक वृत्ती विकसित व्हायला मदत होते. सर्वंकष सकारात्मक मानसिकता हवी असेल तर विचारांबरोबर समझोता करावा लागतो. हे जुळवून घेणे सुरुवातीला अवघड वाटत असले तरीही सवयीने जमते.

लेखसंग्रह

कोरस

Category:

 

काही दर्दभरी गाणी (बहुतांशी मुकेशची ) ऐकत काम करत बसलोय. त्याच्या आवाजातील वेदनेला अधिक भावविभोर करतोय पार्श्वभूमीचा कोरस ! ” संसार हैं एक नदिया ” असो वा “कई सदियोंसे !” हा कोरस नायक -नायिकेचे , गायक -गायिकेचे सुखदुःख अधोरेखित करतो. त्याला एक खर्ज,एक खोली बहाल करतो.

लेखसंग्रह

रिडेव्हलपमेंट (पुनर्निर्मिती? पुनर्विकास?)

Category:

 

आपले दिवस सरले तेव्हा गाशा गुंडाळलेला बरा, असं त्या वाड्याला वाटत असेल कां ? भर डेक्कनवर, चव्हाट्यावर आपलं वय झाल्याचं वर्तमान प्रसिद्ध केल्याबद्दल संकोच, किंचित उद्वेग आणि बराचसा राग त्या वास्तूच्या मनात आला असेल कां ? किंवा ” मेकअप ” मुळे आपण अधिक तरुण, चित्ताकर्षक, लोभस दिसणार म्हणून आतून नवी हिरवाई जाणवत असणार कां ?