साहित्य - ललित

कृतज्ञता

Category:

 

कृतज्ञता ही कदाचित एकमेव अशी भावना असेल जिचा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अनुभव येतोच पण ती अभावानेच व्यक्त होते. एकतर आपण इतरांना गृहीत धरत असतो आणि त्यात काय मोठं? ते त्या व्यक्तीचं कामच आहे. त्यासाठी त्याला पगार मिळतो, मग वेगळं कौतुक /कृतज्ञता यांची गरज काय? किंवा आपण बर्‍याच गोष्टींवर आपला हक्क मानत असतो. अशावेळी या ना त्या कारणाने कृतज्ञता राहूनच जाते.

लेखसंग्रह

दवोत्सव

Category:

 

सोसायटीच्या गेटवरचा नवा वॉचमन हसून स्वागत करता झाला आणि त्याने अदबीने बॅरिकेड वर केलं. मीही त्याला ” काय म्हणतंय धुकं आणि थंडीची रात्र कशी गेली ? ” असं विचारलं. त्याने होकारात मान हलवली.

लेखसंग्रह

बोल मेरे साथिया (ललकार)

Category:

 

१९७२ च्या भुसावळमध्ये अमरदीप टॉकीज ला प्रीमियर रिलीज झालेला हा चित्रपट (खरं तर युद्धपट!) सकाळी सहापासूनचे शो! धर्मेंद्र,राजेंद्र आणि माला सिन्हा ! अवचित हे गाणं भेटलं आणि भिडलं. ” जितनी सागर की गहराई , जितनी अंबर की उंचाई ” अशी प्रेमाची ग्वाही देणारं !

लेखसंग्रह

आर्त

Category:

 

हे आर्तपण मला वळणावळणावर भेटलंय. काही वर्षांपूर्वी ग्रेसची कॅसेट आणली होती. नंतर “निवडुंग ” ची भेट. पण त्याआधी सदर कॅसेट. तिथे एक आर्त काव्य भेटलं-

साहित्य - ललित

दिवंगत आत्मीय बाबासाहेब पुरंदरेंची आठवण !

Category:

 

त्या दिवशीचा नाट्यानुभव (दृक् -श्राव्य) तोही मोकळ्या मैदानात महानाट्याच्या रूपात आमच्या नातीसाठी नवा होता. वयाच्या पाचव्या वर्षी लावणी – कव्वाली , अभंग ,ओव्या, भजन, भारूड, पोवाडा या श्रीमंत परंपरा तिला एका छताखाली भेटल्या. बुरुज होता पण हिरकणीला ती शोधत राहिली. गोष्टींमध्ये ऐकलेली बरीचशी पात्रं तिला अनुभवायला मिळाली. तिने वेळोवेळी ताल धरून दिलेली दाद आम्हीं उभयता एन्जॉय करीत होतो.

लेखसंग्रह

खरं तर मी हे करू शकतो/ते

Category:

 

जीवन ही एक सुंदर भेटवस्तू आहे , त्यामुळे आयुष्य गृहीत धरू नका. काहीवेळा मनासारखे होणार नाही मात्र तुम्हाला पेलणार नाही असे आव्हान तुमच्या कधी वाटयाला येणार नाही. ही आव्हानेच तुम्हाला अधिक ताकतवर बनवतील.

साहित्य - ललित

माणसांना उभे करणारे शब्द !

Category:

 

” शब्दांचा हा खेळ मांडला ” असं मागणं मांडणाऱ्या महानोरांनी ” तुझा शब्द दे आकाशाचा ” असं ईश्वराला विनवलं आहे. देशभक्तीपर गाण्यांमध्ये, पोवाड्यांमध्ये ऊर्जा असते ती जीवनाला ध्येय देणारी, दिशा दाखविणारी ! अशा शब्दांचे ऋण मानताना, माझ्या आवडत्या दोन ओळी –

लेखसंग्रह

हरवले आहेत…. !

Category:

 

माणसे मुळात हरवतात का? ती हरवतात म्हणजे नेमके काय होत असते? आणि हरवण्याच्या (जगाच्या दृष्टीने) कालावधीत ही मंडळी कोठे असतात आणि काय करीत असतात? अशी हरवलेली मंडळी खरंच सापडतात का? असतील तर त्याचे पोस्टर का लागत नाही ?- ” सापडले “म्हणून ! शोधाशोध थांबली याचा आनंद नको का? एक वर्तुळ पूर्ण झाले.

साहित्य - ललित

निर्मितीचे हात आणि दुरुस्तीचे हात !

Category:

 

सर्जनाला अनेक हात लागतात. कलाकृतीची निर्मिती अनेक हातांपासून संपन्न होते. पण बरेचदा हे निर्मितीचे हात अदृश्य असतात. काहीतरी नवं तयार करणं यासाठी दैवी घटक तर लागतातच पण मानवी मदतही तितकीच गरजेची असते.

साहित्य - ललित

झी’ चा अगोचरपणा !

Category:

 

काल दुपारी दोनच्या सुमारास झी टीव्ही च्या दोन वेगवेगळ्या चॅनेल्सने अगोचरपणा केला. एकाचवेळी एकाच थीम वर आधारीत दोन चित्रपट सुरु केले. एका चॅनेलवर ” मेहबुबा “- खन्ना आणि हेमा वाला !