जीवनावर प्रभाव टाकणारे चार घटक
Category:
लेखसंग्रहआज आपण आपले जीवन उदात्त बनवण्याच्या चार मौल्यवान घटकांवर विचार करूया. हे घटक आपल्या नियतीला दिव्यत्वाच्या मार्गावर खचितच नेतील. त्याच्या पूर्तीसाठीच हा मानवी जन्म आपणांस बहाल करण्यात आला आहे. पृथ्वीवरील मानवाच्या आगमनामागचे जे ज्ञात पैलू आहेत- ज्ञान, आकलन, बुद्धिमत्ता, समज, परिपक्वता, ते सारे साध्य होण्यासाठी हे चार घटक महत्वाचे ठरतात. हा “आत्मज्ञानाचा ” मार्ग आहे.