मेरा वो सामान “लौटा “दो !
Category:
साहित्य - ललितमाणसांची वैश्विक गंमत असते- सुरुवात “मी ” पासून होते. मग वाटेत नातं /नाती येऊन जोडली जातात की शब्द तयार होतो “आपण “. काळाच्या ओघात फक्त काही जिवलग नातीच पैलतीराला जाऊन थांबतात.
Category:
साहित्य - ललितमाणसांची वैश्विक गंमत असते- सुरुवात “मी ” पासून होते. मग वाटेत नातं /नाती येऊन जोडली जातात की शब्द तयार होतो “आपण “. काळाच्या ओघात फक्त काही जिवलग नातीच पैलतीराला जाऊन थांबतात.
Category:
लेखसंग्रह१९७५ च्या मध्यावर मी भुसावळ सोडले पण तोपर्यंत गावातील तीन हिंदू -मुस्लिम दंगलींचा अनुभव गाठीला होता. पोलिसांचे वेढे,अस्ताव्यस्त जनजीवन, अंधारलेली अनाम भीती आणि वातावरण निवळायला लागलेला वेळ !
Category:
साहित्य - ललितभूतकाळ हे असे फक्त “स्वतःचे “असतात -फक्त स्वतःचे ! आसपासच्यांना कधी ते दुरून दिसतात, कधी हलकेच स्पर्शून जातात , पण एखादा “रुहानी ” आवाज वाला किशोर त्यांना छेदून जातो , एखादा गुलज़ार त्यावरची खपली काढतो.
Category:
लेखसंग्रहकार्यसंस्कृतीवर परिणाम होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. अर्थात त्यांवर सहजासहजी एकमत होत नाही. प्रदूषित कार्यसंस्कृतीची व्याख्या संस्थेनुसार बदलत जाते आणि ती व्याख्या मतमतांतरे निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते. मात्र धोक्याचे इशारे एकसारखे असतात.
Category:
लेखसंग्रहआयुष्यात खूप बडबड केल्याची आणि शांत न राहिल्याची खंत आजकाल उसासून वाटते. आपण निःस्तब्ध झाल्यावरच आयुष्याच्या प्रवाहावर सूर्य आणि चंद्र स्वतःचे ठळक प्रतिबिंब मागे विसरून जात असतात. शब्द पोरके झाले की प्रतिमांचा आधार घ्यावा आणि प्रतिमांचे चेहेरे धूसर झाले की शांततेला शरण जावे. मामी शांत झाली म्हणजे यातनांना शरण गेली असा जसा अर्थ होतो, तसेच मला वाटते शांतता म्हणजे भोग नसतात.
Category:
लेखसंग्रहराहुलच्या किर्तीमुळे, यू -ट्यूब मुळे शास्त्रीय संगीताकडे वळलेली तरुण पिढी काल मोठ्या संख्येने चित्रपट गृहात होती. अन्यथा १९८३ साली निवर्तलेल्या या सूर्यासारखे दाहक गाणाऱ्या गायकासाठी चाळीस वर्षांनी नवी माणसे (जी कदाचित त्यावेळी जन्मलेलीही नसतील) फिरकली नसती.
Category:
लेखसंग्रहयू ट्यूब वर राज्य सभा चॅनेलवरील “विरासत “हा एस डी वर (बर्मनदा ) बनविलेला कार्यक्रम बघत होतो. एकदम एस डी -आर डी ही पिता -पुत्रांची जोडी आठवली. कार्यक्षेत्र एक पण स्पर्धा नाही, कारण दोघांची संगीतावर स्वतंत्र नाममुद्रा ! प्रत्येकाचे गाणे ओळखू येते. नातं रक्ताचं असलं तरी रचना परक्या !
Category:
साहित्य - ललितआत्मस्वर स्पष्ट असो वा कुजबुजीच्या स्वरात तो केव्हाही पथदर्शकच ठरू शकतो विशेषतः त्याची गरज भासत असते तेव्हा! आत्मस्वर हा भावनांच्या, क्षणिक आवेगाच्या पार असतो आणि आपल्याला एखाद्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवू शकतो. हा आत्मस्वर कालातीत असतो- भूतकाळाचे अनुभव जोखून मार्ग अधिक निष्कंटक करीत असतो, वर्तमानाची काळजी तर घेत असतोच पण भविष्याचा रस्ता प्रकाशित करीत असतो.
Category:
साहित्य - ललितविजया मेहेतांच्या विद्यापीठातील हा आज्ञाधारक विद्यार्थी ! त्यांच्याबरोबर तो “हमीदाबाईची कोठी ” मध्ये दिसला. नंतर पाहिलं बालगंधर्वच्या “पुरुष ” मध्ये- रीमा बरोबर ! याच्या यशाची कमान सतत चढती. सिनेमातही अमिताभ (कोहराम), राजकुमार (तिरंगा) वगैरे तोडीसतोड दिसला. अगदी अलीकडच्या “काला” मध्ये दक्षिण दैवत -रजनीकांत बरोबर कोठेही कमी नाही. स्वतःची अटीट्युड, स्वतःच्या अटी ! मोकळाढाकळा, मध्यंतरी VJTI मध्ये तरुण पिढीशी निवांत गप्पा मारणारा, at ease – पायजमा /झब्बा या मराठी पोषाखाची लाज न बाळगणारा.
Category:
लेखसंग्रहराजच्या चित्रपटात प्रत्येक कलावंत किती वेगळा आणि खराखुरा,ताजा वाटतो. स्वतःचे कलारंग अस्सलपणे उधळताना जाणवतो. ही राजची छाप त्यांच्यातून उणीच करता येत नाही. तोच कलाकार इतर चित्रपटांमधून फिका,निस्तेज वाटतो. प्रत्येकाचं आतलं सर्वस्व काढून घेऊन त्याने कलाकारांचे शिल्प सजीव केले. त्याच्या परिसस्पर्शाची झळाळी लेऊन कितीतरी कलादेह इथे चिरंतन होऊन गेलेत.
Copyright © 2025 | Marathisrushti