लेखसंग्रह

स्वतःची टिमकी !

Category:

 

स्वतःच्या कर्तृत्वाचा,रोज करीत असलेल्या (भलेही ते किरकोळ का असेना) कामाचा सार्थ अभिमान बाळगणारे सदैव नमस्काराचे धनी असतात.जी मंडळी स्वतःच्या कौशल्याला ( ते कोणत्याही क्षेत्रातील असो) सतत धार लावून ते तीक्ष्ण करीत असतात त्यांनाही सलाम करण्यात काही गैर नसते.

साहित्य - ललित

लढा अथवा पळ काढा !

Category:

 

सध्याच्या २४x ७ न्यूज संस्कृतीने आपल्या प्रतिक्रिया/प्रतिसाद तसेच इन्स्टंट करून ठेवले आहेत.बरेचसे अननुभवी वार्ताहर पोरकटपणे हातात भ्रमणध्वनी आणि माईकचे नळकांडे घेऊन इतरांच्या आधी आणि खातरजमा न करताच सनसनाटी ब्रेकिंग ओकताना दिसतात आणि लगेच समाजमाध्यमांवर बरावाईट वर्षाव सुरु होतो… आपले सगळे निर्णय सध्या माध्यमे घेताना दिसतात. आपले शब्द,प्रतिसाद,कृती याबाबत खूप काळजी घेण्याची सध्या नको तितकी गरज निर्माण झालेली आहे.

लेखसंग्रह

हमने तुमको देखा

Category:

 

संपूर्ण “खेल खेल में ” महाविद्यालयीन जोशाने भरलेला ! हा, नीतू आणि राकेश रोशन – रॅगिंग , स्टेजवरील धमाका , थोडीशी रहस्य फोडणी , ” आजा मेरी बाहो में आ ” वाली अरुणा . बाहेर आलो तेव्हा खऱ्या अर्थाने तरुण झाल्यासारखं वाटलं.

अलविदा’ नसलेली ‘एक्झिट’ !
लेखसंग्रह

अलविदा’ नसलेली ‘एक्झिट’ !

Category:

 

डोळ्यांनी बोलणारी फक्त दोन माणसं मला या चित्रपटसृष्टीत आवडली – एक तो “निळ्या डोळ्यांचा जादूगार “(राज कपूर )आणि दुसरा हा! मराठीतला आपला चपखल शब्द वापरायचा तर हा “भोकरडोळ्या ” होता. पण इतकी बोलकी नजर अपवादात्मक ! त्याचे सारे संवाद ओठातून नंतर उमटायचे पण ते काम आधी डोळ्यांनी केलेलं असायचं.

लेखसंग्रह

माझं माझं दुःख !

Category:

 

दुःख वाटल्याने कमी होतं म्हणे ! हेही पटत नाही. माझ्याकडचं एक किलो दुःख चार जणात वाटल्याने ते प्रत्येकी २०० ग्रॅम ( मी धरून पाच ) होत नाही. माझ्यासाठी ते एक किलोच राहतं आणि प्रदीर्घ काळ टिकतं . नवं दुःख आलं म्हणजे जुनं विसरलो असं होत नाही. ते सतत असतच आणि एकाकी असताना नव्याने, पूर्ण शक्तीनिशी भिडतं.

लेखसंग्रह

चकीत’ करणारी नाती !

Category:

 

नात्यांनी,जवळीकेने आजकाल चकीत व्हायला होतं – जी नाती कधी रुजतच नाहीत, ती जवळ आल्यावर धसकल्यासारखं होतं आणि दूर गेली की सुस्कारा सोडल्यासारखं हायसं वाटतं.

साहित्य - ललित

घटनेच्या पृष्ठभागाखाली

Category:

 

ख्रिस रॉक आणि विल स्मिथ यांच्यातील ऑस्कर सोहोळ्यातील “देवाण -घेवाण ” दिसलीच असेल दूरदर्शनच्या पडद्यावर ! रॉकने स्मिथच्या पत्नीबाबत खुलेआम एक शेरेवजा विधान केले. त्याबदल्यात व्यासपीठावर जाऊन स्मिथ ने त्याला थोबाडीत दिली. याही घटनेच्या तळाशी काहीतरी शिकवून जाणारा धडा आहे. वरवर न्यायाधीश बनून निकाल देण्याच्या आपल्या (भोचक, अनाहूत) सवयीच्या पलीकडे जाऊन आपली “समज” खोल करणारे काही हाती गवसतंय का हे पाहणे आपल्याला प्रगल्भ करत असते.

लेखसंग्रह

तथास्तू !

Category:

 

त्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात उगाचच हॉर्न वाजवत गाडी फिरवायला सुरुवात केली. संतपूर सरांना हे पटले नाही. त्यांनी गाडीजवळ जाऊन त्यांना ठाम शब्दात समज दिली की “हा महाविद्यालयाचा परिसर आहे आणि सध्या परीक्षा सुरु आहेत. तुम्ही आमच्या आवारात येऊन गोंधळ घालू नका”.

साहित्य - ललित

कान्हा’ ची आगळीक आणि ‘श्याम’ची मनधरणी !

Category:

 

मग १९७० च्या “ट्रक ड्रायव्हर” या अनामिक चित्रपटात ( मी मनाच्या भूतकाळात हे नांव आणि गाणंही विसरून गेलो होतो. परवा “वेदांतश्री” च्या वासंतिक अंकात लताबद्दल लेख वाचताना अचानक तळाशी जाऊन बसलेले हे गाणे- “कान्हा रे कान्हा, तूने लाखो रास रचाए” उसळून वर आले) त्याची आगळीक नव्याने भेटली.

लेखसंग्रह

काळाची लेखणी

Category:

 

“बॅरिस्टर ” केलं विक्रम गोखलेने! त्यानंतर सचिन खेडेकरने प्रयत्न केला. पण विक्रम तो विक्रमच! लागूंच्या नंतर खूपजणांनी ” नटसम्राट “चे शिवधनुष्य शब्दशः उचललं , पण नांव कोरलं गेलं ते फक्त श्रीराम लागू!