लेखसंग्रह

सकारात्मक दृष्टीकोन

Category:

 

जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो. जेव्हा आपण सकारात्मक लहरी आपल्या जीवनात निर्माण करतो तेव्हा आपण सकारात्मक घटना आपल्या आयुष्यात आकर्षित करतो आणि त्याचा आपल्या ध्येयाप्रती उपयोग होतो.

लेखसंग्रह

आयुष्याचा निर्णय कुणाचा ?

Category:

 

आपलं आयुष्य कसं असावं हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. जे विद्यार्थी आई वडिलांनी पसंतीचं करीयर करू दिलं नाही म्हणून आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडतात. तसंच घरच्यांचा विरोध असतांनाही व्यसनं करतात, आपल्याच पसंतीचा जोडीदार आणतात. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला जेथे सोईस्कर असते तिथे आपण आपले निर्णय घेतो आणि इतर ठिकाणी आपल्या त्रासाचा किंवा अपयशाचा दोष दुसऱ्यांना देतो.

लेखसंग्रह

अशी जपा आपल्या प्रेमाची नाती

Category:

 

सध्या मोबाईलच्या युगात बरेच जण प्रत्यक्ष भेटणं कमी आणि सोशिअल मीडियावर चॅटिंग करण्यात  जास्त वेळ घालवतात तसेच सध्याच्या जगात बरेच जण स्वतःचा खूप विचार करतात पण आपल्या नात्यांना फारस महत्व देत नाही. सध्या सोशिअल मीडियाच्या जमान्यात आणि धावत्या आयुष्यात महत्वाची असणारी नाती हरवत चालली आहेत.त्याच नात्यांना जपण्यासाठी काही खास टिप्स येथे देत आहे…

लेखसंग्रह

अनसेफ मोड’ मधले आपण

Category:

 

आपण सध्या unsafe mode मध्ये व्यवहार करीत आहोत.तुमचे लोकेशन, डेबिट कार्ड ,क्रेडीट कार्ड ,online खरेदी ,whats app ,फेसबुक या सर्व नव्या गोष्टींचे अप्रूप असल्याने आपण त्या सर्वांच्या आहारी गेलो आहोत .तुम्ही फेसबुक वरून सुद्धा लॉग इन करून खरेदी करू शकता. तुमचे लोकेशन ,तुम्ही वापरत असलेला मोबाईल नंबर ,सर्व काही सार्वजनिक झाले आहे.

लेखसंग्रह

राईट टू डिस्कनेक्ट !

Category:

 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी अलीकडेच एक अत्यंत महत्वाचे विधेयक लोकसभेत मांडले .हे एक खासगी विधेयक होते .त्या विधेयकाचे नाव होते Right to disconnect.या विधेयकावर सोशल मिडीयावर फार चर्चा झाली नाही आणि बातम्यांमध्ये सुद्धा हे विधेयक जरा दुर्लक्षित राहीले .खरेतर या विधेयकावर दूरदर्शन वर विशेष चर्चा व्हायला हवी होती पण ती झाली नाही.

लेखसंग्रह

साधता संवाद..संपतील वाद… !

Category:

 

तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होतॊय..काम शाळा नोकरी यामुळे आधीच वेळ मिळत नाही त्यातच तंत्रज्ञांच्या वापरामुळे नात्यातील संवाद कमी होतोय. त्यामुळे नातेसंबंध दृढ करण्यासाठी आता आपल्याला संवादाचे दरवाजे उघडावे लागतील. संवाद ही कला आहे. आपण काय बोलतो यावर नात्याचं भवितव्य अवलंबुन असतं. आपल्या बोलण्यानं एखाद्याला प्रेरणाही मिळू शकते किंवा एखाद्याचं मनही दुखू शकतं.

लेखसंग्रह

महात्मा गांधी यांना अनावृत्त पत्र

Category:

 

आदरणीय महात्माजी,  विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ जगतवंद्य विभूती आपणांस मानले जाते. विलक्षण निर्भयता, नम्रता, कमालीची साधी राहणी, दीन-दलितांविषयी अथांग करुणा आणि शोषितांबद्दल सहानुभूती या गुणांचा संगम आपल्या ठिकाणी होता. तत्वज्ञान ही जीवनाबरोबर विकसीत होणारी गोष्ट आहे, हे आपल्या बाबतीत खरे आहे. नैतिकता हेच संस्कृतीचे अधिष्ठान, संयम व त्याग हाच तिचा आत्मा. सुखोपयोगी साधने वाढविण्याची संस्कृती सध्या निर्माण होत आहे. श्रमप्रतिष्ठेची पीछेहाट होत आहे.

लेखसंग्रह

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण..!

Category:

 

प्रत्येकजण आपल्याला आयुष्यात त्याच्या पद्धतीनुसार जगत असतो. आपल्याला मिळालेल्या आयुष्यावर खूपदा तो नाखूष असतो. तथाकथित सुखाचा सदरा मला का नाही मिळाला ? असा गैरसमज करून घेत आपण आपल्या आयुष्याला दोष देत बसतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे? हा प्रश्न प्रत्येकाने मनाला विचारला कि उत्तर आपोआप समोर येते..!

लेखसंग्रह

व्यवसाय प्रशिक्षण – एक सतत चालणारी प्रक्रिया

Category:

 

शाळा-कॉलेजमधले आपले शिक्षण पूर्ण झाले. शैक्षणिक वर्षाला एक पूर्णविराम असतो.पण एकदा नोकरी लागल्यानंतर ती टिकवून ठेवण्यासाठी, उच्च पदावर जाण्यासाठी पुन्हा अभ्यास करावाच लागतो. व्यवसायात आणि पेशातही तसेच आहे. फरक एवढाच आहे, प्रशासकीय सेवेत असणार्‍या किवा बँक कर्मचार्‍यांना स्वतःच्या पैशांतून प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. व्यावसायिकाला मात्र धंद्यात टिकून राहण्यासाठी अपडेट राहण्यासाठी स्वतः पदरचे पैसे खर्च करावे लागतात.

लेखसंग्रह

मानवनिर्मित प्रलय : केदारनाथ’

Category:

 

महापूर, भूकंप, ज्वालामुखी या अगोदर ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून ओळखले जायचे. पण माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे त्याच आता ‘मानव निर्मित आपत्ती’ म्हणून ओळखले जातात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे २०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेला महापूर.