लेखसंग्रह

प्रगल्भ युवा निर्मिती आध्यात्मानेच शक्य !

Category:

 

एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांची ज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपत पडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणारा आपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे. 

लेखसंग्रह

मतदान नव्हे मताधिकार

Category:

 

प्रत्येक निवडणुकीला इथला नागरिक मतदान करत असतो परंतु तो मतदान नव्हे तर मताधिकार बजावत असतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. संविधानिक तरतुदीनुसार हा मताचा अधिकार इथल्या प्रत्यक नागरिकाला दिला आहे .आणि ते दुसऱ्याला दान म्हणून देने हे थोडे अयोग्य वाटते कारण सर्वसाधारण पणे आपण आपले अधिकार कधी दान केले असे वास्तवात कोणतेच चित्रण अद्याप दिसलेलं नाही किंवा दिसणार ही नाही.

लेखसंग्रह

संवाद……. कधीही महत्वाचा !

Category:

 

सध्याच्या युगात “व्यक्तिगत संवाद” खूपच कमी झालेला आहे. दुसऱ्याजवळ आपला विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी आवश्यकता असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीमुळेच आपल्या विचारांना नवी दिशा व नवा आयाम मिळतो.

लेखसंग्रह

मैत्रीची परिभाषा

Category:

 

तसे पाहिले तर आपण जन्माला एकटे येतो आणि जाणार पण एकटेच असतो. त्यामुळे मैत्री अमर असते, जीवास जीव देणारी असते ह्या सर्व बोलायच्या गोष्टी असतात. कोणाचेच आयुष्य कोणावाचून थांबत नसते. हेच सर्व प्रकारच्या संबंधांना लागू आहे. त्यात कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक आणि व्यावसायिक संबंधातही असे कप्पे करून जगल्यास आयुष्य सुखकर होते.

लेखसंग्रह

शुभ सकाळ.. उगाच एक morning dose

Category:

 

काही महिन्यांपूर्वी एका भावाशी चॅट करत होते. थोडा disturbed होता तो. त्यामुळे सांगत होता, की “ताई, तुझ्याशी बोलून नेहमी खूप positive वाटतं. तू प्लीज माझ्यासाठी रोज एक good morning मेसेज टाकशील? खूप मदत होईल त्याची मला..”

लेखसंग्रह

अहंकार – अर्थात Ego…….

Category:

 

सहजच म्हंटल जातं. “आमक्या कडे इतकं असून सुद्धा त्याला अजिबात Ego नाही”(पैसा, बुद्धी, सौदर्य, कला किंवा काहीही) म्हणजे इतरांपेक्षा कुणा कडे काही जास्त असेल तरच त्याला Ego ची मुभा असते का ?

लेखसंग्रह

निमित्य गोकुळाष्टमी – जन्म नव्या ‘कृष्णा’ चा !

Category:

 

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी कृष्ण हवाच, या आशयाच्या पोस्ट या आधी वाचल्या सुद्धा असतील, जो मदत करतो, हात देतो, धीर देतो, अब्रू वाचवतो, शिष्टाई करतो, रण सोडून पळून जातो, रणांगणात हत्यार उचलत नाही, सारथी बनतो, सखी बनून खेळतो, खेळवतो…..

लेखसंग्रह

निसर्गकन्या – बहिणाबाई चौधरी – जन्मदिनी मानाचा मुजरा

Category:

 

लेखिका – उषा शशीकांत जोशी – बहिणाबाई किंवा बहिणाबाईंची गाणी ही मराठी भाषेतील अपूर्व निर्मिती आहे. लौकिक अर्थाने त्‍या अडाणी (अनपढ) निरक्षर होत्या. लेखन, वाचनाच्‍या संस्‍कारांची सुतराम ही शक्यताही नव्हती. त्‍यामुळेच त्यांच्या निसर्गदत्त प्रतिमेबद्दल आश्चर्य वाटावं इतकी त्‍यांची कविता, शब्द, वाक्य, ध्वनी, छंद, यमक, अनुप्रास अशा भाषेच्या नियमांमध्ये पूर्णपणे बसणारी आहे. खरोखर अलौकिक प्रतिमेचं देणं म्हणजे काय याचं प्रत्‍यक्ष उदाहरण म्हणजे बहिणाबाईंची कविता होय.

लेखसंग्रह

महात्मा, मुन्नाभाई ते संजू

Category:

 

महात्मा गांधी आज अनेकांना हवे आहेत, अनेकांना नको आहेत. आऊटडेटेड माणसं व तत्वज्ञान आजच्या परिस्थितीत वापरुन तरुणांना काही संदेश देतांना आजच्या परिस्थितीत relevance, त्याचं दाखवता आलं तरी पुरेसं आहे. महात्मा आज बंदिस्त झाले आहेत. नोटात महात्मा, फोटोत महात्मा, मात्र प्रत्यक्ष जीवनात सगळा खोटाच व्यवहार.

लेखसंग्रह

भव्य देवालय आणि भक्त (रूपक कथा)

Category:

 

भक्तांनी त्यांच्या अवतारी देवतेचे भव्य मंदिर उभारले. मंदिराचा कळस सोन्याचा होता. मंदिरात भव्य सभामंडप होते. सभामंडपाच्या भिंतींवर बारीक कोरीव काम हि होते. गर्भगृहात माणिक-मोती धारण केलेली त्या देवतेची सुवर्ण मूर्ती होती. मंदिराच्या आवारात भक्तांची गर्दी होती. सर्वांचा मनात देव दर्शनाची अभिलाषा.