लेखसंग्रह

समाज प्रबोधनातून रोखली जाईल स्त्री – भृणहत्या ….

Category:

 

स्त्री -भृण हत्या का होतात याचे उत्तर खर तर समाजाच्या मानसिकतेत दडले आहे. आई – वडिलांना मुलगी नकोशी असते असे नाहीये, पण मुलगी म्हणजे खर्च असे समीकरण कुठेतरी मनात पक्के बसले आहे. जन्माला आल्यापासून तिच्या हुंड्यासाठी तजवीज करावी लागणार असे पालकांना वाटते. स्त्रीला दुय्यम वागणूक द्यायची सुरुवात लहानपणापासून होते. आरोग्य, पुरेसा आहार, उच्च शिक्षण याबाबतीत मुलींना डावलले जाते.

लेखसंग्रह

विल यु बी माय व्हॅलेन्टाईन

Category:

 

प्रेम, माणसांना जोडणारं सुरेख रसायन. किती सखोल, किती मृदु, तरल आणि माणसांना कोणत्याही गोष्टीत आपलंसं मानून स्वत:त गुंतून ठेवणारं. तितकंच निरागस, अबोल पण प्रभावी, चिरंतन, अमर, नात्यातले बंध घट्ट करणारी एक अदभूत नैसर्गिक देणगी.

लेखसंग्रह

२०१२ चा दु:खद शेवट…..

Category:

 

पण प्रश्न खरा हाच आहे की एवढं सगळं झाल्यावरतरी २०१३ मध्ये परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? की हे असेच निरंतर सुरु रहाणार… नेतेमंडळी, तथाकथित (so called) सामाजिक कार्यकर्ते, मिडिया वगैरे आपल्या पोळ्या भाजून घेणार आणि आपण असेच मूकपणे बघत रहाणार?

लेखसंग्रह

पाण्याचे संकट होत चालले बिकट !

Category:

 

पृथ्वीतलावर तीन रत्ने आहेत जल, अन्न आणि सुभाषित. परंतू मुर्ख माणसे दगडांच्या तुकड्यांना रत्नांची संज्ञा देतात. असे प्राचीन ग्रंथामध्ये, सुभाषितकारांनी यथायोग्य वर्णन केले आहे. रत्नतुल्य किंबहुना त्यापेक्षा मौल्यवान असलेले पाणी हे सजीवांचे प्राण होय.

लेखसंग्रह

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर राजकारण

Category:

 

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर राजकारण करण्याचा पायंडा राजकीय पक्षानी पाडला आहे. इतर कोणत्याही मुद्यांना हात न लावता या भावनिक मुद्याचा लाभ घेण्याच्या हेतूने आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रकार राजकीय पक्षानी चालविला आहे.

लेखसंग्रह

एका पुतळ्याची ‘कर्म कथा’

Category:

 

१३ जून १९६९ या दिवशी आ. अत्रे आपल्यातून निघून गेले, वरळीच्या ‘शिवशक्तीतून‘ दादरच्या स्मशानभूमीपर्यंत त्यांची जी प्रचंड अंत्ययात्रा निघाली ती आजही लोकांना आठवत असेल. आ. अत्रे गेले आणि मराठीचा अत्यंत अभिमानी असा महापुरूष निघून गेला. आ. अत्रे गेल्यानंतर १९७६ पर्यंत ‘मराठा‘ दैनिक चालू राहिले व ते नंतर बंद पडले. ‘शिवशक्ती‘ सुध्दा दुसर्‍यांच्या हातात गेली त्यामुळे आ.अत्रे यांचे नाव मराठी माणसांच्या स्मृतीपटलावरून हळूहळू नाहीसे होऊ लागले. ज्या महापुरूषाने मबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई प्राणपणाने लढून जिंकली, त्याचे मराठी मनाला विस्मरण होऊ लागले याची टोचणी वृत्तपत्रव्यवसायात काम करणार्‍या माझ्या काही मित्रांनाही लागून राहिली.

लेखसंग्रह

सत्पात्री दान

Category:

 

नुकतीच एक बातमी वाचली की मुंबईतील भिकारी दरवर्षी रुपये १८० कोटी कमावतात. काय हा दानशूरपणा! खरोखरच भीक मागणे हा सुध्दा एक मोठा उद्योगच झालेला आहे.