लेखसंग्रह

श्री स्वामी समर्थ

Category:

 

श्री गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा. श्री स्वामी समर्थांमध्ये या तिन्ही रूपांचा समावेश होतो. खरंतर स्वामींकडे तुम्ही ज्या भावनेने पाहता तेच रूप तुम्हाला त्यांच्यात दिसेल म्हणूनच स्वामींच्या काही मठांमध्ये आपल्याला त्यांची स्त्री देवतेच्या रूपातली आदिशक्ती मूर्ती प्रतिमा दृष्टीस पडते. निदान ते रूप पाहून तरी आपण त्या शक्तीचा आदर केला पाहिजे.

लेखसंग्रह

शिवमहिम्न स्तोत्र – मराठी अर्थासह – भाग १

Category:

 

भाविकांच्या मते, भगवान शंकराचे माहात्म्य व साधेपणा सांगणारे, शिवमहिम्न स्तोत्र हे अत्यंत प्राचीन स्तोत्र आहे. त्याच्या कालासंदर्भत विविध अभ्यासकांनी विविध मते मांडली आहेत.

लेखसंग्रह

सदगुरु श्री स्वामी स्वरूपानंद

Category:

 

घरातील सांप्रदायिक वातावरणामुळे पारमार्थिक संस्कार लहानपणापासून झाले होते. ते अलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषयांत पारंगत होत होते. रामचंद्रांना संस्कृत विषयात रस होता. एकीकडे त्यांचे आध्यात्मिक विषयांचे वाचन, श्रवण, मनन, निदिध्यास सुरु होते, तर दुसरीकडे त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या काळात पारतंत्र्याच्या जोखडाखाली सापडलेल्या भारत देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. तरुणाई नवचैतन्याने भारुन गेली होती.

लेखसंग्रह

एका महासिद्धाचे जीवनदर्शन

Category:

 

स्वामी स्वरूपानंद आत्मज्ञानी होते. आत्मज्ञानी मनूष्य ब्रह्मज्ञानाच्या तेजोवलयात वास करीत असतो. तसे स्वामी होत. म्हणून जनात असूनही ते जनावेगळे होते. हाडामांसाचा देह त्यांनी धारण केला होता. तथापि त्याच्या बंधनात ते वावरले नाहीत. किंबहुना हाडामांसाचा देह ज्या पंचतत्त्वांपासून निर्माण होतो त्या पंचतत्त्वाशी त्यांनी एकरूपता साधलेली होती. त्यामुळे ते श्रीमंतीचे वैभवही भोगत होते आणि दीन दरिद्री दुःखी, दुबळ्यांची आर्तताही आत्मीयतेने जाणत होते. एक विराट विलक्षण तथा सहज, सामान्य या सगळ्यांची राखण करून प्रेमाने ओतप्रोत भरलेले जीवन ते जगत होते.

लेखसंग्रह

दत्ता दिगंबरा

Category:

 

दत्तप्रभूंची विविध रूपे अवतार पाहायला मिळतात. आजही कुठल्या ना कुठल्या रूपात ते आपल्याला भेटतात .आपल्या मनीषा पूर्ण करतात. योग्य मार्ग दाखवतात पण हे रूप ओळखण्यासाठी आणि ते जाणून घेण्यासाठी साधनेची, निष्ठेची, भक्तीची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नितांत श्रद्धेची व सबुरीची गरज आहे.

लेखसंग्रह

बेळगांव निवासी प. पू. आई श्री कलावतीदेवी यांच्या सहवसातील अनुभव

Category:

 

प. पू. आईंचा अनुग्रह घेतल्यापासून माझ्या आईचे मन त्यांनी घालून दिलेल्या भजनाच्या नेमामध्ये स्थिर झाले आणि तिचा आणि तिच्यामुळे माझा (माझी शाळा सांभाळून) भजनाचा नेम चालू झाला. देवाच्या कृपेने माझ्या आईचा व माझा आवाज चांगला असल्यामुळे आम्ही भजनात उंच पट्टीत भजन म्हणायचो. भजनात सतत आमचा आवाज येत असल्याने आमच्या समोर आई भजनाच्या वेळेत येऊन बसायच्या त्यावेळी मध्येच डोळे उघडून न्याहाळणी करायच्या. त्यावेळी आईंनी आमच्यावर टाकलेल्या कृपाकटाक्षाने आम्हाला भजन म्हणण्यात अधिक स्फूर्ती मिळावयाची.