लेखसंग्रह

प्रवास पंख्यांचा

Category:

 

पूर्वीच्या कचेऱ्या ब्रिटिशकालीन बांधणीच्या असल्यामुळे त्यांचं छत फार उंच असायचं. उंचावरून लोंबत पंखा तोलणारे लांबच लांब पोकळ लोखंडी पाइप आणि त्यांना लावलेले पंखे काचेऱ्यांत जागोजागी लटकलेले असायचे. बरं हे पंखे, जेवण जड झाल्यासारखे दिसायलाही तुंदीलतनू आणि त्यांची पातीही जाड आणि जड अंतःकरणाने फिरल्यासारखी फेरे घ्यायची. वेगाच्या अगदी वरच्या नंबरवर ठेवला तर कुठे खाली बसणाऱ्याना थोडीफार हवा लागायची झालं.

लेखसंग्रह

ज्येष्ठांच्या चष्म्यातून

Category:

 

मला नक्की काय हवंय किंवा काय मिळवायचय हे एकदा पक्कं झालं ना मग चिडचिड , तडतड होत नाही. घडलेली प्रत्येक गोष्ट स्वतःला लावून घेण्याची सवय जडली ना की उगीचच राग राग होतो.

लेखसंग्रह

बदललेल्या जागा आणि गोष्टी

Category:

 

अगदी सकाळी झोपून उठल्यापासून विचार करायचा म्हटलं तर उठल्यानंतर शेजारच्या घड्याळाकडे जाणारे किंवा देवासमोर जोडले जाणारे हात आज मोबाईल कडे जाऊ लागलेयत. या दोघांची जागा त्याने कधीच बळकावलीय. त्यानंतर, ब्रश करताना मोरीत किंवा बेसिन समोर उभं राहूनच आपण ते करत होतो. आज ब्रशवर पेस्ट घेऊन आणि गॅलरीत उभं राहून ते ओंगळवाणं आणि ओघळणार दृष्य साऱ्या जगाला दाखवत अनेकजण ब्रश करत असतात.

लेखसंग्रह

कन्नुदादा ( एक काल्पनिक व्यक्तिचित्र)

Category:

 

कन्नुदादा गेला, पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. आईचं सगळं क्रियाकर्म आटपून कन्नुदादा घरी परतला तोच तापाने फणफणत. ताप, खोकला आणि उपाशी पोट. दुसऱ्या दिवशी म्यूनसिपालिटीच्या दवाखान्यात नेलं त्याला. टेस्ट केली आणि ती positive आली.

लेखसंग्रह

दोस्त, दोस्ती आणि बरच काही…

Category:

 

आता तिसऱ्या प्रकारातल्या दोस्त्यांमध्ये मोडणाऱ्या दोस्तांना दोस्त म्हणणं तितकसं सयुक्तिक नसतं. कारण यामधल्या प्रत्येकाचं मनाने एकमेकांशी काहीही देणं घेणं नसतं. दारू, व्यसनं, या एकाच अजेंड्याखाली सगळे एकत्र आलेले असतात.