लेखसंग्रह

तळा ‘गाळातले ‘

Category:

 

मध्यंतरी आमच्या सोसायटीची सांडपाणी वाहून नेणारी ड्रेनेज व्यवस्था तुंबली. त्यातच पावसाळ्याचे दिवस होते. पावसाचं पाणी, गटार भरून वहाणाऱ्या सांडपाण्यात मिसळून दुर्गंधी आणि डासांचा फैलाव वाढू लागला. सोसायटीच्या केरकचरा, सफाई करणाऱ्याला विचारलं, त्याने असमर्थता दर्शवली, पण दुसऱ्या दिवशी दोन माणसांना या कामासाठी तो घेऊन आला आणि म्हणाला, “हे करून देतील काम”.

लेखसंग्रह

लेकीच्या अल्प मुक्कामाचा आनंद

Category:

 

पाच दिवस माहेरपणाला राहून, आजच आमची लेक सासरी रवाना झाली, आणि लेकीच्या वास्तव्याने गजबजलेलं आमचं घर शांत झालं. तसे आम्ही घरात तिघं असतो. आणि उभयतां पती पत्नी, आणि आमचा लेक. पण तो असतो पाऊण दिवस त्याच्य कामात आणि त्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये अथवा वाचनात, ही स्वयंपाक, इतर कामं निपटून, तिच्या असंख्य मैत्रिणींच्या व्हॉट्सॲप समूहात आणि मी माझ्या लेखन वाचनात. आपापल्या कक्षेतून बाहेर येऊन थोड्याफार गप्पा होतात.

लेखसंग्रह

जगावेगळी

Category:

 

त्यांचं वेड जगावेगळंच ,
अनाकलनीय आहे सगळंच.
विचार वेगळा वेगळंच जगणं,
कृतीत प्रत्यक्ष, न पोकळ बोलणं.

लेखसंग्रह

गुरू एक जगी त्राता

Category:

 

आमच्या गोपुजकर बाईंना या जगातून जाऊन साडेतीन महिने उलटले. कोरोना येण्याच्या आधी एक वर्षापूर्वी झालेली त्यांची पुनर्भेट अगदी आजही विसरली जात नाही.

लेखसंग्रह

बृहन्मुंबई महानगरपालिका (आरोग्य विभाग)

Category:

 

एक सुखकारक अनुभव मुंबई महानगरपालिका , त्यांची कार्यपद्धती , गोंधळाचं वातावरण , हलगर्जीपणा आणि त्यातूनही महानगरपालिकेची इस्पितळं तर फारच भयानक , केविलवाणी परिस्थिती , तिथे येणारे रुग्ण , डॉक्टरांचा निष्काळजीपणा यावर आपण नेहमीच बोलत असतो , बोटं मोडत असतो. या संपूर्ण कोरोना काळात तर मुंबई महानगरपालिकेच्या इस्पितळांबद्दल सतत उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या.

लेखसंग्रह

भावपूर्ण

Category:

 

म्हणजेच माझ्या मनातले विचार, माझी मनोवस्था, मनातली चलबिचल, मनातले भाव चेहऱ्यावरून, शब्दामधून, अभिनयामधून, गायनामधून किंवा आपण करत असलेल्या कोणत्याही कार्यामधून समोर येत असतात. आपल्याकडे नाट्यधर्मी, रंगधर्मी, कलाधर्मी, चित्रधर्मी, काव्यधर्मी असे शब्द पूर्वी रूढ होते. त्या त्या धर्माचं आचरण करणारा तो धर्मी. या कलेच्या परिभाषा पुढे लुप्त झाल्या.

लेखसंग्रह

उर्मिला एक व्यक्तिचित्र

Category:

 

दहिसर पश्चिमेला आमचा मासळीबाजार. दहिसर पूर्वेकडून सबवे मधल्या चिंचोळ्या उंचवट्यावरून तिरपं चालत पश्चिमेला गेलं की लगेच मासळीबाजार लागतो. त्याला समांतर पंचवीस तीस पावलं चालल्यावर, दोन तीन फुलंवाल्या फुलांचे वाटे घेऊन बसतात. प्रत्येकीच्या डाव्या उजव्या बाजुला, घाऊक बाजारातून आणलेल्या फुलांची बोचकी असतात, आणि त्यातल्या फुलांचे वाटे समोर मांडलेले असतात.

लेखसंग्रह

मदतीचा हातभार

Category:

 

भेंडी नावाची भाजी चिरायला तुम्हाला सांगतो, मला अज्जीबात आवडतं नाही. बुळबुळीत कुठची ! चिरताना तिच्या नावाचा उद्धार करत असतो मी. एकतर तिचे तुकडे सुरीला चिकटतात, नाहीतर एकमेकांना. सुरी आपटून आपटून ते खाली पाडावे लागतात. बरं, हिने दहा वेळा तरी सांगितलेलं असतं,
“वरचा मुकुट कापलास की बघ रे, आत काळं आहे का. असेल तर तो भेंडा घेऊ नकोऽऽऽस.”

लेखसंग्रह

वॉशिंग मशीन एक लावणे

Category:

 

बायकोने नेहमीप्रमाणे मला न आवडणारा प्रश्न विचारला. कपडे धुणारायस का ? कसं वाटतं ते ! म्हणजे मोरीत बसून मी धोका हातात घेऊन कपडे बडवतोय , असं चित्र डोळ्यासमोर येतं. मी अनेकदा तिला म्हट्लं “अगं वॉशिंग मशीन लावतोयस का ? असं विचार ना”. त्यावर ती लगेच “का ! त्यामुळे काय फरक पडतोय ?” असा प्रतिप्रश्न करते.

लेखसंग्रह

चाट आणि सँडविच

Category:

 

तर चाट, अर्थात भेळपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, दही बटाटा पुरी, रगडा पॅटीस इ. इ. इ.. अर्थात जीभ चिक्कार चाळवणारे चविष्ट पदार्थ. सोबत भैयाच्या हाताची कमाल आणि खाऊन तृप्त झाल्यावर अखेरीस, उकडून कुस्करलेला बटाटा,. बारीक शेव आणि चाट मसाल्याच्या स्टफ्फिंगसह तोंडात जाणारी गोल पुरीची मुखशुद्धी.