लेखसंग्रह

बाप आणि लेक

Category:

 

आपल्याला पहिला मुलगाच हवा, मुलगा म्हणजे कुळाचा उध्दारकर्ता , मुलगी काय परक्याचं धन असले विचार तर आम्हा दोघांच्याही मनाला कधी शिवले नाहीत. मुलीच्या जन्मानंतर आठ वर्षांनी आमच्या घरात एका गोड लेकाचा जन्म झाला, ही गोष्ट वेगळी.

लेखसंग्रह

“Nature Stay”, सफाळे (१००%निसर्ग सान्निध्यात)

Category:

 

शब्दकळेच्या प्रवासाला निघायचं ठरतं. दिवस ठरलेला असतो. हळूहळु सगळे जमायला लागतात. तहानलाडू भूकलाडू सोबत घेऊन लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सगळ्या वयोगटातील शब्दकळेच्या प्रवासाला निघालेले प्रवासी एकत्रित होतात.

लेखसंग्रह

देवगड हापूस 

Category:

 

मूळ देवगड हापूस आंबा, हे प्रकरण काय आहे, हे ज्याने तो एकदा खाल्लाय त्यालाच कळू शकतं. पुलंनी उगाच नाही त्याला “सगळ्यांचो बापुस” असं म्हटलंय. एकदा का देवगड हापूस मुखात गेला, की इतर सगळे आंबे त्याच्यापुढे अगदी फिके वाटू लागतात. त्याचं रूप, त्याची कांती अगदी वेगळी असते. सुरकुतलेला , थकलेला, मरगळलेला देवगड हापूस असूच शकत नाही.

लेखसंग्रह

मर्यादा पुरुषोत्तम

Category:

 

राम हा पूर्णपुरुष आहे. तो एका वचनाधीन राज्यकर्त्यांचा अज्ञाधारक पुत्र आहे. ज्या कैकयीमुळे त्याला थोडंथोडकं नव्हे तर चौदा वर्ष वनात जावं लागलं अशा आईविषयी कणभरही मनात किंतू, राग न धरणारा मुलगा आहे. तो एकपत्नीव्रत घेतलेला निष्ठावंत पती आहे.

लेखसंग्रह

काय म्हणावं याला? योगायोग, चमत्कार की काही?

Category:

 

आंध्रच्या सीमेवरचं गाव, तिरूवन्नमलै. जिथे तिथल्या वातावरणाने मन प्रसन्न करणारा एक आश्रम आहे. आश्रम म्हणजे, त्या परिसरात एक शंकर मंदिर, वेदविद्याध्ययन करणारी पाठशाळा, आश्रमात येणाऱ्या लोकांसाठी राहण्याची उत्तम सोय, ध्यानधारणा करण्यासाठी शांत प्रसन्न वाटणारी एक प्रशस्त खोली. या ठिकाणी रमण महर्षी नावाचे एक थोर संत होऊन गेले. त्यांच्याच नावाने हा आश्रम आहे, रमाणाश्रम. आश्रमात सकाळ संध्याकाळ धार्मिक विधी, वेदपठण सुरू असे. आश्रमाच्या मागच्या बाजुला, पसरलेला अरुणाचल पर्वत आहे.

लेखसंग्रह

सांगावसं वाटलं म्हणून , त्या भाजीविक्रेत्या

Category:

 

मुख्य बाजारात जाण्याआधी डावीकडे जाणाऱ्या एका रस्त्याने थोडं पुढे आलं की तिथे तीन रस्ते एका ठिकाणी मिळतात . अगदी सकाळी साडेआठ नऊ पासून या जागी त्यांची डेरेदाखल व्हायला सूरवात होते. प्रत्येकीचं अढळपद ठरलेलं असतं. ट्रेनमधून भाजीच्या टोपल्या, बोचकी उतरवून पुढे ऑटोने आपल्या नित्याच्या जागी त्या दाखल होतात आणि आपला भाजीबाजार मांडायला सूरवात करतात. यामध्ये फळभाज्या, पालेभाज्यापासून चिकू , पेरू, जाम (रानफळ) पिवळ्या सालीची केळी, झेंडूची, जास्वंदीची फुलं अशा बऱ्याच गोष्टी असतात.

लेखसंग्रह

बालमोहन विद्यामंदिर

Category:

 

दादासाहेब रेगे हे व्यक्तिमत्त्व काय होतं, आणि त्यांच्या बालमोहनने आपल्या बाळांना काय दिलं, हे प्रत्येकजण सांगू लागला असता, तर एक सप्ताहच आयोजित करावा लागला असता. आपण एका मराठी शाळेत शिकलो, याचा सार्थ अभिमान, उपस्थित प्रत्येक कीर्तिवंताच्या बोलण्यातून डोकावत होता.