येमेनमधील भारतीयांच्या सुट्केसाठी ऑपरेशन राहतची यशस्वी समाप्ती
Category:
लेखसंग्रह५६०० हुन जास्त नागरिकांना युध्दभुमी येमेन मधुन सुरक्षित बाहेर काढल्यानंतर “ऑपरेशन राहत” अत्यंत यशस्वीरित्या ०९ एप्रिलला समाप्त झाले. शेवट्याच्या खेपेमधल्या भारतीय नर्सेस बरोबर विदेश राज्यमंत्री जनरल वी के सिंह देशात परत आले. या बरोबर विदेशी देशात चालवलेले सर्वात मोठे ऑपरेशन सफल झाले. जनरल वी के सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली यामधे भारतीय नौसेना, वायुसेना, एयर इंडिया बरोबर भारतीय रेल्वेने भाग घेतला.