लेखसंग्रह

न संपणार्‍या विवरात पाकिस्तान

Category:

 

आपल्याकडे ‘पेराल ते उगवते अशी एक म्हण आहे. ही म्हण तंतोतंत लागू पडणारे जगातील एक प्रमुख राष्ट्र म्हणजे पाकिस्तान. आजवर भारताविरुद्ध आणि जगाविरुद्धच्या दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानची अवस्था आज दयनीय झाली आहे. तेथे अंतर्गत दहशतवादाने थैमान घातले असून पंजाब या पाकिस्तानचे हृदय समजल्या जाणार्‍या प्रांतात नुकत्याच झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये तेथील गृहमंत्र्यांचा मृत्यू झाला आहे.

लेखसंग्रह

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सागरी सुरक्षेची समिक्षा

Category:

 

मुरुड तालुक्यातील आठ जण संशयास्पदरीत्या फिरताना ०८ /०८ /२०१५ ला आढळून आले आहेत. हे सर्व जणवेळास्ते, वावडुंगी आणि सायगाव परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आले आहे. याबाबत जिल्ह्य़ात सर्वत्र नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

लेखसंग्रह

पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न ?

Category:

 

पाकिस्तानवरील विजयाचे स्मरण देणारा ‘कारगिल विजयदिन’ भारतात साजरा व्हावा आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुदासपूर जिल्ह्यात दीनानगर येथे दहशतवाद्यांनी १२ तास धुमाकूळ घालावा, हा नियोजित हल्ला आहे. गेले काही दिवस ‘बब्बर खालसा’ ही दहशतवादी संघटना हालचाली करीत होती.

लेखसंग्रह

बांगलादेशमध्ये होणारी गोवंशाची तस्करी आणि त्याचा दहशतवादावर परिणाम

Category:

 

बांग्लादेशमधून अफू, गांजा, चरसचीही तस्करी भारतात केली जाते. भारतातुन बांग्लादेशमधे गोवंशाची तस्करी भारतात केली जाते. तस्करी रोखण्यात यश आले तर, बांगलादेशी घुसखोरी पण कमी होइल. भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेले सीमा सुरक्षा दल आता भारतातून बांगलादेशात होणार्‍या गायींच्या चोरट्या निर्यातीविरोधात उभे ठाकले आहेत.

लेखसंग्रह

पाकिस्तान, चीन, भारत आणि अफगाणिस्तानातला वाढता दहशतवाद

Category:

 

अफगाणी तालिबानचे, अलकायद्याचे हजारो दहशतवादी जे सध्या अफगाणिस्तानच्या सैन्याविरुद्ध लढत आहेत, त्यांना काही काम उरणार नाही. अशा दहशतवाद्यांना पाकिस्तान भारताच्या काश्मिरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करेल. यामुळे तिथे दहशतवाद, येणार्‍या काळामध्ये वाढू शकतो. भारतानं अंतर्गत सुरक्षा यंत्रणा मजबूत करणं गरजेचं आहे. गुप्तहेर संघटनांनी सतर्क राहणे गरजेचं आहे.

लेखसंग्रह

भारतीय सैन्य शांतता काळात काय करते

Category:

 

जयपूर येथे ‘सीमा सुरक्षा’विषयक एका परिसंवादात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या भाषणातील एका विधानाला नकारात्मक रंग देऊन संरक्षण मंत्र्यांना अकारण वादात ओढण्याचा सुरू झालेला खटाटोप अनाकलनीय आणि अनाठायी आहे.

लेखसंग्रह

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौरा: भारत बांगलादेश संबंध नवीन वळणावर

Category:

 

मोदी सरकारने परराष्ट्र धोरणावर भर देऊन जागतिक संबंध सलोख्याचे व्हावेत, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मोदींच्या दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्यामुळे जे वातावरण बांगलादेशमध्ये पाहावयास मिळाले, ते दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक मजबूत करणारेच आहे.

लेखसंग्रह

सागरी सुरक्षेत गुणात्मक सुधारणांची गरज

Category:

 

१७ मे २०१५ला समुद्रात नौदलाच्या बोटीवरून खोल समुद्रामध्ये मच्छिमारांच्या बोटीवरील गोळीबारात सुशांत लुजी (२४) हा खलाशी जखमी झाला .त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘खरिस्ताएल’ या बोटीवरील मच्छिमार बेकायदेशिररित्या समुद्रात टाकलेली जाळी ओढण्याचे काम करीत होते.ओएनजीसी ओइल प्लॅट फॉर्म जवळ रात्रीच्या वेळेस प्रखर लाइट असल्यामुळे जास्त मासे मिळतात.सुरक्षा रक्षकांनी मच्छिमारांना हटकले. नंतर हवेत गोळीबार करण्यात आला.

लेखसंग्रह

मिशन मैत्री : नियोजित, कार्यक्षम, शिस्तबद्ध ऑपरेशन

Category:

 

नेपाळची राजधानी काठमांडू येथे झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि मनुष्यहानी झाली आहे. सुमारे १० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, हजारो इमारती, रस्ते, पूल, वीजपुरवठा, पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या सार्वजिक सुविधा भूकंपामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत.

लेखसंग्रह

मुफ्ती महंमद सईद आणि फुटीरतावाद्यांचा आगीशी खेळ

Category:

 

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोरे सातत्यपूर्णपणे अधिक तापत आहे (तिथे हिंसाचार/दगडफ़ेक सुरु करायला कुठलेही निमित्य चालते?) फुटीरतावादी नेत्यांनी या आगीस भडकावण्याचे चोख काम केले आहे. सदर वातावरण अस्थिरच राहत त्यावर आपली छाप कशी राहील हेच पाहिले जात आहे. भारता विरुध्द सतत गरळ ओकणारे अजून वेगळे काय करणार? अनेक सवलतींच्या नावाखाली या देशात पाय ताणून आरामात सुस्त, मस्तपैकी रहाता येत असल्याने यांची पिढय़ानपिढय़ा सुरु असलेली गुर्मी अधिकच बळकट होताना दिसत आहे.