सुखांत

टाळ मृदंग वीणा बोले
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
पाऊलांनी वाट धरली
कानी नादतो अभंग..

संसाराची जोड देत
चालू लागले वारकरी
मन रमले विठूराया
माझे चंद्रभागा तिरी..

रूप सावळे सुंदर
कर कटावरी उभा
विश्वव्यापी चेतना
पांडुरंग दिव्य शोभा..

तन मन लीन व्हावे
रहावे हरीनाम मुखात..
मागणे काय मागावे
चरण स्पर्श सुखांत.

प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-

https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

Author