तुझ्या ओढीने आले इथवर
सांग जायचे आता कुठवर…
ओंजळ भरण्यासाठी एकदा
दान टाकशील का रे मूठभर..
बांध फुटतो सांग कितीदा
अश्रू ओघळे ह्या बांधावर ..
कवेत घ्यावे मला कुणीतरी
श्वासातून जीव माझा झरझर..
मुकेच गाते जीवन सरिता
सूर आळवण्या नाही प्रियकर..
दऱ्या खोऱ्यात आटली नाही
पाणी पिते स्वतः च घोटभर..
फुलली वनराई मळे बहरले
लाट उसळली अंतिम टप्प्यावर
चिरंतन तप करून युगांचे
समिप आला अनंत रत्नाकर
Author
Post Views: 15