स्त्री-मुक्ती

कशाला करतोय आपण पोकळ वल्गना स्त्री-मुक्तीच्या....

जर होत असतील लहान,तरूण,विवाहीत,मतीमंद आणि

निडर स्त्रियांवरही बलात्कार दिवसा ढवळ्या....

स्त्री मुक्त झाली कस म्हणणार

जर समाज लादू पहात असेल

बंधन त्यांच्या चालण्या- बोलण्यावर,

राहण्या- वागण्यावर त्यांच्या स्त्री-सुलभ भावनेवर

आणि स्त्रीच्याच गर्भात वाढणार्या

स्त्रीचाच बळी घेत असेल ती गर्भात असताना...

स्त्री-मुक्ती जर पुरूषांच्याच हातात असेल

तर स्त्री – मुक्तीसाठी लढणार्या

स्त्रियांचे बळी जातच राहणार

हजारो वर्षापर्यत कदाचित पुढच्या...

स्त्री-मुक्ती अस काही नसत

जर स्त्रियांनी नाकारल पुरूषांना

त्यांच्यावरील त्यांच्या वर्चस्वाला

तर क्षणात येईल स्त्री-मुक्ती अस्तित्वाला...

स्त्री – मुक्ती ही एखाद्या स्वप्नासारखी आहे

दिसते पण प्रत्यक्षात येत नाही

कारण ती प्रत्यक्षात येण्यासाठी स्त्रीयांना

बळी द्यावा लागेल त्यांच्या

स्त्रीत्वाचा जसा स्त्रीयांवर अन्याय करणार्यां

पुरूषांनी दिलाय त्यांच्या पुरूषत्वाचा....

-- निलेश बामणे



कशाला करतोय आपण पोकळ वल्गना स्त्री-मुक्तीच्या….

जर होत असतील लहान,तरूण,विवाहीत,मतीमंद आणि

निडर स्त्रियांवरही बलात्कार दिवसा ढवळ्या….

स्त्री मुक्त झाली कस म्हणणार

जर समाज लादू पहात असेल

बंधन त्यांच्या चालण्या- बोलण्यावर,

राहण्या- वागण्यावर त्यांच्या स्त्री-सुलभ भावनेवर

आणि स्त्रीच्याच गर्भात वाढणार्या

स्त्रीचाच बळी घेत असेल ती गर्भात असताना…

स्त्री-मुक्ती जर पुरूषांच्याच हातात असेल

तर स्त्री – मुक्तीसाठी लढणार्या

स्त्रियांचे बळी जातच राहणार

हजारो वर्षापर्यत कदाचित पुढच्या…

स्त्री-मुक्ती अस काही नसत

जर स्त्रियांनी नाकारल पुरूषांना

त्यांच्यावरील त्यांच्या वर्चस्वाला

तर क्षणात येईल स्त्री-मुक्ती अस्तित्वाला…

स्त्री – मुक्ती ही एखाद्या स्वप्नासारखी आहे

दिसते पण प्रत्यक्षात येत नाही

कारण ती प्रत्यक्षात येण्यासाठी स्त्रीयांना

बळी द्यावा लागेल त्यांच्या

स्त्रीत्वाचा जसा स्त्रीयांवर अन्याय करणार्यां

पुरूषांनी दिलाय त्यांच्या पुरूषत्वाचा….

— निलेश बामणे

Author