सोनचाफा

निर्मळ आंनदाचे
सुख ओंजळीत होते..
सोनचाफ्यापरि मन
तिचे सुगंधीत होते..

अलगद घेतला झाकून
सुगंध राहिला दरवळून..
आणला तिने हातातून
सोनचाफा एकदा दडवून..

माळला होता केसात
मन भरून आले गंधात..
उभी एकटी ती बागेत
रात्र सरली अशी चांदण्यात...

लाजेने चूर होती ती
हातात घेऊन सोनचाफा..
न बोलताच कळल्या मला
तिच्या प्रेमाच्या आणाभाका..

निरोपाची सांगता आज
भेटली ती मज दुराव्याने..
मन मात्र माझेच होते
सोनचाफ्याच्या पुराव्याने..

सुकलेल्या सोनचाफ्याने
शेवटचा बोलही ऐकला होता..
पाकळी न पाकळीने
उलगडली होती प्रेमकथा..
कोवळ्या पानांवर
लपलेली कळी..
लाजत होती जशी
गालावरची खळी..

वाऱ्याने स्पर्शिता
शहारली खरी..
स्वप्नात रमलेली
जणू एक परी...

अल्लड ,अवखळ
खेळात ती रंगली
कृष्ण बासरीत
जशी राधा दंगली..

मायेच्या सावलीत
उद्या फुलायचे..
सजले तीचे रूप
आज नवलाई चे..



निर्मळ आंनदाचे
सुख ओंजळीत होते..
सोनचाफ्यापरि मन
तिचे सुगंधीत होते..

अलगद घेतला झाकून
सुगंध राहिला दरवळून..
आणला तिने हातातून
सोनचाफा एकदा दडवून..

माळला होता केसात
मन भरून आले गंधात..
उभी एकटी ती बागेत
रात्र सरली अशी चांदण्यात…

लाजेने चूर होती ती
हातात घेऊन सोनचाफा..
न बोलताच कळल्या मला
तिच्या प्रेमाच्या आणाभाका..

निरोपाची सांगता आज
भेटली ती मज दुराव्याने..
मन मात्र माझेच होते
सोनचाफ्याच्या पुराव्याने..

सुकलेल्या सोनचाफ्याने
शेवटचा बोलही ऐकला होता..
पाकळी न पाकळीने
उलगडली होती प्रेमकथा..
कोवळ्या पानांवर
लपलेली कळी..
लाजत होती जशी
गालावरची खळी..

वाऱ्याने स्पर्शिता
शहारली खरी..
स्वप्नात रमलेली
जणू एक परी…

अल्लड ,अवखळ
खेळात ती रंगली
कृष्ण बासरीत
जशी राधा दंगली..

मायेच्या सावलीत
उद्या फुलायचे..
सजले तीचे रूप
आज नवलाई चे..

Author