जगून घे जरा
उद्याची वाट पाहू नको..
कोणाच्या विचाराने
तू विचार बदलू नको…
तुझ्यात आहे
आत्मविश्वासाची खाण..
स्वतःच जरा
देत जा स्वतःलाच मान..
खचलेल्या मनाला
उभारी तूच देशील..
दुःख जात्यावर भरडत
सुखाची ओवी गाशील..
निवाऱ्याचे ठिकाण
तुझे तुच व्हावे..
प्रेमळ सावली म्हणून
इतरांकडे का पहावे?
संघर्षाच्या अनेक घडल्या
जन्मोजन्मी गाथा..
एखादीच झाली आहे
जिजाऊ सम माता
सन्मानाने जगण्यासाठी
स्वतःला पात्र ठेव..
स्वाभिमानाने जगण्याची
खात्री मात्र ठेव..
Author
Post Views: 2