शीळ वाजवीतो

शीळ वाजवीतो
वेळूमध्ये वारा
जसा मुलींना बघून
कुणी टारगट पोरगा .
-
रानोमाळ धावतांना
वेग अफाट वार्‍याचा
नांव प्रेयसीचें घेतां
जसा हृदयाच्या ठोक्यांचा .
-
नेतो त्याच्यासंगें
वारा ढगांना ओढून
जशी युवती सुंदर
खेची तरुणांचे मन .
-
खेळतसे लपंडाव
सूर्य मेघांबरोबर
दिसे, वात्रट कोणी मारी
डोळा, पोरीच्या समोर .
-
क्षितिजावर नभांत
जाई भूमी मिसळून
प्रियकराच्या मिठीत
जशी प्रिया सामावून .

सुभाष स. नाईक



शीळ वाजवीतो
वेळूमध्ये वारा
जसा मुलींना बघून
कुणी टारगट पोरगा .

रानोमाळ धावतांना
वेग अफाट वार्‍याचा
नांव प्रेयसीचें घेतां
जसा हृदयाच्या ठोक्यांचा .

नेतो त्याच्यासंगें
वारा ढगांना ओढून
जशी युवती सुंदर
खेची तरुणांचे मन .

खेळतसे लपंडाव
सूर्य मेघांबरोबर
दिसे, वात्रट कोणी मारी
डोळा, पोरीच्या समोर .

क्षितिजावर नभांत
जाई भूमी मिसळून
प्रियकराच्या मिठीत
जशी प्रिया सामावून .

सुभाष स. नाईक

Author