बासरीत रमणारी
राधा तुझीच..
तूझ्या समोर हरणारी
राधा तुझीच..
श्वासात वसणारी
राधा तुझीच..
समीप नसणारी
तरी राधा तुझीच…
तुझीच ओळख
तुझ्याशी निरंतर
नात्यात बांधणारी
रूप तिचे .. सोज्वळ
राधा तुझीच..
कृष्णाच्या लीला
जाणणारी.. नितांत
सुंदर प्रेमळ राधा तुझीच..
कृष्णा राधा तुझीच..
तुझ्या नावाचे उच्चारण जरी
तरी प्रारंभी राधा तुझीच…
Author
Post Views: 17