आज तळ्याकाठी..
गुलाबी त्या क्षणांची
साक्ष घेऊन ओठी..
मंद तेजस्वी चंद्र
पाकळ्यांत भिजला..
नितळ प्रतिबिंब
पाहताच थिजला..
चंद्रास मोह झाला
पाहून ती चांदणी..
रूप तळ्यातील
तिचे घालते मोहिनी..
हरवला चंद्र
चांदणीच्या रूपात..
लखलखली चांदणी
लाजली नभांगणात..
Author
Post Views: 15