प्रेम म्हणजे काय आहे ?
ते कसं व्यक्त होतं ? एखाद्या युवकाने एका देखण्या मुलीवर भाळणं आणि त्या देखण्या मुलीनं त्या युवकावर भाळणं हे स्वाभाविक असतं, पण त्यास प्रेम म्हणण्याऐवजी आकर्षण म्हटलं पाहिजे. आकर्षण आणि प्रेम या भिन्न बाबी असूनही काही क्षणापुरते ते दोघे एकजीव होतात व बऱ्याच जणांची इथे फसगत होते..
कधी-कधी ज्यांच्यावर तुमचं प्राणापलीकडे प्रेमं असतं त्याच्या हृदयालाही त्यामुळे ठेच पोहचते. अगदी आपल्या मनाविरुध्द पण डोळयात आलेले अश्रू आणि कंठातील हुंदक्याचे कढ आतल्या आत गिळून जीवनाचा आणि जगाचा एक भाग बनून राहावं लागतं. प्रत्येक क्षण, प्रत्येक वस्तू, प्रत्येक जागा, तिच्या आठवणी जागवत असतात, क्षणोक्षणी डोळे ओले करतात अन् आयुष्य उदास करुन जातात. ही व्यक्ती जर तुमची प्रेमिका असेल तर मग जीवनाचे गणितच कठीण होऊन बसते. आपल्याला तिची जी आठवणं आटलेल्या विह्निरीच्या तळाशी असलेल्या पाण्यासारखे किंवा वैराण नदीतील वाळूच्या आतील ओलाव्यासारखी आनंद देते. प्रेम एकमेकांच्या आयुष्यात प्रेरणा ठरत असेल, त्या प्रेमाच्या शब्दाने जर आपली करिअरकडे जाणारी उंच भरारी आणखी वेगाने जात असेल तर ते आदर्श प्रेम, तिनं आपल्याला व्यसनापासून दूर नेणं ते आदर्श प्रेम, एकमेकांच्या सहवासात एकांतात् प्रेम न’ करताही एक प्रेरक वरदान ठरेल. कॉलेजमधल्या तरुणांना ह्या भावना आवरण एक आव्हानचं आहे. आपली प्रेयसी नाही, म्हणजे कॉलेजमध्ये मजा नाही असं काही तरुणांना वाटत असेल पण शिक्षक, नातेवाईक सांगतात की, हे पाऊल दोघांच्या दृष्टीने घातक आहे तर याचा प्रत्ययही नंतर येतो. मान्य आहे की, आजकाल माणसातला जिव्हाळा संपला, कधी-कधी कुणालाही वाटते की नकळत वा जिव्हाळयाची एखादी व्यक्ती आपली असावी असं वाटतं. त्या व्यक्तीशी आपलं कोणतच नात नसावं. पण तो माणू आपलं असावं असं वाटते, परंतु भावनेच्या भरात बऱ्याचवेळा आपण एखादा निर्णय घेतों आणि त्यालाच विश्व समजतो नंतर आपल्या करिअरच्या वाटा आपणच बंद करतो.
– निलेश सुरेश कवळे (सुपुत्र)
