दुष्काळानंतरचा पाऊसगारवा देणारा असतो,
प्रेयसीने प्रियकराच्याजखमेवर प्रेमाने फुंकर घालावी तसा…
तापलेली जमिन पावसानेथंड झाल्यावर आनंदाने हिरवा शालू नेसते,
साखरपुड्यात नववधू नेसतेतसा…
सृष्टीचे हे बदलेले रूपशेतकरी डोळेभरून पाहातो,
प्रियकर आपल्याप्रेयसीचे अप्रतीम सौंदर्य चोरून पाहातो तसा…
शेतकर्याच्यास्वप्नांना पावसात नवीन पालवी फुटून तो आनंदी होतो,
प्रेयसीशीच लग्नठरल्यावर प्रियकर होतो तसा…
©निलेश बामणे
Author
Post Views: 10