वृक्ष वेली पाने फुले
पक्षी प्राणी जलाशय..
सुखावते विश्व सारे
देव आहे कृपामय..
दिले दान मुक्तहस्ते
वापरावे समाधानी..
प्राणवायू अन्न वस्त्र
दिले आहे वृक्षातूनी..
प्रदूषण नियंत्रण
करू आपल्या कराने…
कचऱ्याची विल्हेवाट
ओल्या सुक्या फरकाने..
प्लास्टिकच्या टाळण्याने
जलप्रदूषण नष्ट..
झाडे लावून घालवू
वायूप्रदूषण क्लिष्ट..
वाढलेले तापमान
पावसाने झोडपले..
निसर्गाचा अवमान
हिमनग वितळले..
नका करू ऱ्हास असा
रोज पर्यावरणाचा
चला घेऊन वारसा
नैसर्गिक संपत्तीचा..
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/