पाऊल अंगणी थिजले होते
अश्रूंनी डोळे भिजले होते
अंतर राहिले वळून जाताना
अंगणात रोप सजले होते
रोपात होती नवलाई छान
हळूहळू पण रुजले होते
खारट आंबट तिखट गोड
सारे काही शिजले होते
संसाराचे सार पचवता
म्हणते सुखात निजले होते
नाही टळला बापाचा घोर
कन्यादानात हात धजले होते
लेक समंजस होती तिला
बापाचे काळीज समजले होते
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

Post Views: 24