पर्जन्य काल समीप येता (सुमंत उवाच – १०५)

सुमंत जयंत परचुरे. 

पावसाळा जवळ आला, आता नालेसफाई कधी होणार? परत या वर्षी मुंबई तुंबणार का? किती दिवस ट्रेन बंद राहणार पावसामूळे? या सारख्या अनेक चिंता लोकांना सतावू लागतात आणि मग त्यावर काही ठोस उत्तर मिळाले नाही की मग लोकं व्यवस्थापनाच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करतात.



पर्जन्य काल समीप येता
साठवण करावी धान्याची
फुटके भांडे माती लाविता
चिंता मिटते द्रव्याची!!

अर्थ–

पावसाळा जवळ आला, आता नालेसफाई कधी होणार? परत या वर्षी मुंबई तुंबणार का? किती दिवस ट्रेन बंद राहणार पावसामूळे? या सारख्या अनेक चिंता लोकांना सतावू लागतात आणि मग त्यावर काही ठोस उत्तर मिळाले नाही की मग लोकं व्यवस्थापनाच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करतात. आपल्या भागात सुद्धा सरकार, महानगरपालिका, नगरपालिका, यांनी यावं आणि सुधारणा घडवून आणाव्यात. या अपेक्षांवर कित्येक कुटुंब वर्षानुवर्षे हाल सोसतायत. पण जर दासबोध वाचला तर लक्षात येते ती समर्थांनी पर्जन्यकाळात म्हणजेच पावसाळ्यात काय काळजी घ्यावी, काय नियोजन असावे, काय करावे अन काय करू नये याचे उपाय लिहून ठेवले आहेत. जास्त कचरा होणार नाही याची काळजी घेतली की अर्धे आजार नष्ट होतील, पाणी कौलांवर पडून वाया जाते ते जर भांड्यांमध्ये साठवले तर काही प्रमाणात पाण्याची गरज भागवली जाईल, नारळाच्या सुकलेल्या झावळ्या, सुपारीची लांब पानं जर घट्ट विणून कौलांवर ठवली तर फुटलेला भागही तरला जाईल. आता काळानुरूप कौलारू घरं नाहीत त्याला आपण आजच्या जगाशी साधले तर उपयोग जास्त होईल हे नक्की.

पावसाळा काहींना अजिबात आवडत नाही, तर काहींना प्रचंड आवडतो. पण योग्य नियोजन केले तर त्याचा लाभ हा सर्वांनाच.

— सुमंत परचुरे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →

सुमंत जयंत परचुरे.