ढाबा स्टाईल पनिर मसाला

ढाबा स्टाईल पनिर मसाला

सर्व प्रथम 200 ग्रँ. पनिर घ्या. त्याचे तुकडे करून त्याला मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद लावून बाजूला ठेवून द्या.

1/2 तासाने एका पँन मध्ये 3 चमचे तेल आणि एक चमचा तुप घाला. ढाबा स्टाईल मध्ये तेला तुपाचा वापर सढळ हस्ते असतो आपल्याला आवडत नसेल तर प्रमाण कमी करा. त्यात मँरिनेट केलेलं पनिर टाँस करून घ्या. थोडं साँफ्ट होईपर्यंत. मग पनिर वेगळं काढून ठेवून त्याच पँन मध्ये अनुक्रमे जिरं,मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र घाला. प्रमाण आपल्या तिखट आवडेल त्याप्रमाणे मग 2 मोठे कांदे बारीक चिरलेले घाला. रंग हलका ब्राऊन होईपर्यंत परता. मग त्यात 3 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, 2 चमचे धना जिरं पूड, आणि 2 चमचे बेसन घालून चांगलं परतून घ्या. खरपूस.... मसाला चिकटतोय असं वाटलं तर पाण्याचा हबका मारा. मग त्यात 3 मध्यम टोमँटो प्युरी टाका आणि पुन्हा तेल सुटे पर्यंत परतून घ्या. मीठ आणि बारिक चिरलेली कोथिंबिर घाला. शेवटी बाजूला ठेवलेलं पनिर आणि ग्रेव्ही नुसार पाणी घालून झाकण लावून 2 मिनिटं ठेवा....... झालं आपलं ढाबा स्टाईल पनिर मसाला.....

टिप : ढाबा स्टाईल रेसिपित काही जणं फक्त तुपाचा वापर करतात, काही तेलाचा तर काही दोन्हीचा आणि जरा जास्तच..... तसच जेवढे आपण मसाले परतू तेवढी टेस्ट वाढते....



सर्व प्रथम 200 ग्रँ. पनिर घ्या. त्याचे तुकडे करून त्याला मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद लावून बाजूला ठेवून द्या.

1/2 तासाने एका पँन मध्ये 3 चमचे तेल आणि एक चमचा तुप घाला. ढाबा स्टाईल मध्ये तेला तुपाचा वापर सढळ हस्ते असतो आपल्याला आवडत नसेल तर प्रमाण कमी करा. त्यात मँरिनेट केलेलं पनिर टाँस करून घ्या. थोडं साँफ्ट होईपर्यंत. मग पनिर वेगळं काढून ठेवून त्याच पँन मध्ये अनुक्रमे जिरं,मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र घाला. प्रमाण आपल्या तिखट आवडेल त्याप्रमाणे मग 2 मोठे कांदे बारीक चिरलेले घाला. रंग हलका ब्राऊन होईपर्यंत परता. मग त्यात 3 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, 2 चमचे धना जिरं पूड, आणि 2 चमचे बेसन घालून चांगलं परतून घ्या. खरपूस…. मसाला चिकटतोय असं वाटलं तर पाण्याचा हबका मारा. मग त्यात 3 मध्यम टोमँटो प्युरी टाका आणि पुन्हा तेल सुटे पर्यंत परतून घ्या. मीठ आणि बारिक चिरलेली कोथिंबिर घाला. शेवटी बाजूला ठेवलेलं पनिर आणि ग्रेव्ही नुसार पाणी घालून झाकण लावून 2 मिनिटं ठेवा……. झालं आपलं ढाबा स्टाईल पनिर मसाला…..

टिप : ढाबा स्टाईल रेसिपित काही जणं फक्त तुपाचा वापर करतात, काही तेलाचा तर काही दोन्हीचा आणि जरा जास्तच….. तसच जेवढे आपण मसाले परतू तेवढी टेस्ट वाढते….

Author