पं.नारायणराव बोडस

शिक्षणतज्ज्ञ व संगीततज्ज्ञ अशी दोन्ही बिरुदं असणारे पं. नारायण बोडस ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३३ रोजी सांगली येथे झाला. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. थेट विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱ्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले.

नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. गायक नट म्हणून त्यांच्या कारकीदीर्ची सुरुवात 'सौभाग्यरमा' या डॉ. बी. एन. पुरंदरे लिखित नाटकापासून झाली. दाजी भाटवडेकर यांना या नाटकातील नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले. संस्कृत भाषेत नाटके करणाऱ्या दाजींना आपल्या संस्कृत नाटकासाठी असाच बोलक्या चेहऱ्याचा, भारदस्त आवाजाचा व चांगला गायक असणारा नट हवा होता. त्यांनी लगेच 'सं. शारदम्' या नाटकासाठी त्यांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्या अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी सं. सौभद्रम्, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिक, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद, सं. संशयकल्लोळ, सं. धडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकात अविस्मरणीय व गाजलेल्या भूमिका केल्या. त्यांनी काही चित्रपट व टीव्ही मालिकांतूनही काम केले, पण त्यांना संगीत रंगभूमीच अधिक भावली. जनलोकां विस्मय हा, माता वचन दे सदा देशा, या लता शिकवती ही त्यांची काही गाजलेली नाट्यपदं होत.

रंगभूमीवर वावरण्याचे व्यसन काही औरच असते व ते भलेभले सोडू शकत नाहीत. पण नारायणरावांनी वयाची साठी पूर्ण झाल्यावर रंगभूमीची कायमची रजा घेण्याचा निर्णय घेतला आणि १९९३ मध्ये गोव्यात संगीत सौभद्र मध्ये अखेरची भूमिका करून रंगभूमीचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. १२ वर्ष त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संगीत शिकवले. तेथून निवृत्त झाल्यावर २००६ सालापासून ते वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव केला होता. २०१६ मध्ये नारायणराव बोडस यांच्या भगिनी आणि ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांचं निधन झालं.

पं.नारायणराव बोडस यांचे चिरंजीव केदार बोडस त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. पं.नारायणराव बोडस यांचे २७ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

शिक्षणतज्ज्ञ व संगीततज्ज्ञ अशी दोन्ही बिरुदं असणारे पं. नारायण बोडस ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३३ रोजी सांगली येथे झाला. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. थेट विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱ्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले.

नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. गायक नट म्हणून त्यांच्या कारकीदीर्ची सुरुवात ‘सौभाग्यरमा’ या डॉ. बी. एन. पुरंदरे लिखित नाटकापासून झाली. दाजी भाटवडेकर यांना या नाटकातील नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले. संस्कृत भाषेत नाटके करणाऱ्या दाजींना आपल्या संस्कृत नाटकासाठी असाच बोलक्या चेहऱ्याचा, भारदस्त आवाजाचा व चांगला गायक असणारा नट हवा होता. त्यांनी लगेच ‘सं. शारदम्’ या नाटकासाठी त्यांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्या अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी सं. सौभद्रम्, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिक, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद, सं. संशयकल्लोळ, सं. धडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकात अविस्मरणीय व गाजलेल्या भूमिका केल्या. त्यांनी काही चित्रपट व टीव्ही मालिकांतूनही काम केले, पण त्यांना संगीत रंगभूमीच अधिक भावली. जनलोकां विस्मय हा, माता वचन दे सदा देशा, या लता शिकवती ही त्यांची काही गाजलेली नाट्यपदं होत.

रंगभूमीवर वावरण्याचे व्यसन काही औरच असते व ते भलेभले सोडू शकत नाहीत. पण नारायणरावांनी वयाची साठी पूर्ण झाल्यावर रंगभूमीची कायमची रजा घेण्याचा निर्णय घेतला आणि १९९३ मध्ये गोव्यात संगीत सौभद्र मध्ये अखेरची भूमिका करून रंगभूमीचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. १२ वर्ष त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संगीत शिकवले. तेथून निवृत्त झाल्यावर २००६ सालापासून ते वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव केला होता. २०१६ मध्ये नारायणराव बोडस यांच्या भगिनी आणि ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांचं निधन झालं.

पं.नारायणराव बोडस यांचे चिरंजीव केदार बोडस त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. पं.नारायणराव बोडस यांचे २७ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →