पंढरीचा राणा – ८ : पंढरीची वाट

भक्तमनीं कैवल्याची इथें गळाभेट रे
पंढरीत मोक्ष दावी पंढरिची वाट रे ।।

आस एक - पुण्यद पाहिन नदी चंद्रभागा
ध्यास एकमात्र - मोक्षद बघिन पांडुरंगा
एकमात्र भास - दिसतें रूपडें अवीट रे ।।

स्वप्नवत् जहालें - गेलो पंढरिनगरात मी
भारुन, कर जोडुन, ठाके विठूमंदिरात मी
मंत्रमुग्ध होउन पाही विठ्ठलपदिं वीट रे ।।

तेज आगळें विठूच्या सावळ्या मुखावरी
आगळीच नील-आभा गाभार्‍याला भरी
शब्दांच्या पलिकडला तो आगळाच थाट रे ।।

शांत होइ जीवन-नौका, लालसा पुरी मिटे
आलेखच आयुष्याचे वाटुं लागती थिटे
विषय-अवस सरुनी, उजळे ज्ञानदा पहाट रे ।।

विटेवरिल ध्यान सुंदर पाहुनि निजडोळां
भिडे भावना-हिंदोळा आनंदआभाळा
विश्वरूपदर्शन घडलें, मिळे मुक्तिपाठ रे ।।

दिव्य त्या क्षणानें माझा पालटला रंग
ओढ सोडुनी भोगाची, झालो नि:संग
जन्मजन्मिं, पांडुरंगा, मज असाच भेट रे ।।

- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com



भक्तमनीं कैवल्याची इथें गळाभेट रे
पंढरीत मोक्ष दावी पंढरिची वाट रे ।।

आस एक – पुण्यद पाहिन नदी चंद्रभागा
ध्यास एकमात्र – मोक्षद बघिन पांडुरंगा
एकमात्र भास – दिसतें रूपडें अवीट रे ।।

स्वप्नवत् जहालें – गेलो पंढरिनगरात मी
भारुन, कर जोडुन, ठाके विठूमंदिरात मी
मंत्रमुग्ध होउन पाही विठ्ठलपदिं वीट रे ।।

तेज आगळें विठूच्या सावळ्या मुखावरी
आगळीच नील-आभा गाभार्‍याला भरी
शब्दांच्या पलिकडला तो आगळाच थाट रे ।।

शांत होइ जीवन-नौका, लालसा पुरी मिटे
आलेखच आयुष्याचे वाटुं लागती थिटे
विषय-अवस सरुनी, उजळे ज्ञानदा पहाट रे ।।

विटेवरिल ध्यान सुंदर पाहुनि निजडोळां
भिडे भावना-हिंदोळा आनंदआभाळा
विश्वरूपदर्शन घडलें, मिळे मुक्तिपाठ रे ।।

दिव्य त्या क्षणानें माझा पालटला रंग
ओढ सोडुनी भोगाची, झालो नि:संग
जन्मजन्मिं, पांडुरंगा, मज असाच भेट रे ।।

– – –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

Author