क्रिकेटपटू जॉन विस्डेन
ID: 87614
विस्डेन हा इंग्लंडच्या दक्षिणेकडच्या ब्रायटन नावाच्या समुद्रकिनाऱ्यानजीकच्या सुंदर भागात राहायचा. विस्डेनची फलंदाजी बऱ्यापैकी चांगली असली तरी तो प्रामुख्यानं गोलंदाज म्हणूनच गाजला. पण दुर्दैवानं विस्डेनच्या कामगिरीचे अनेक तपशील नष्ट झाले असल्यामुळे त्याविषयी फारसं माहीत नाही. त्यातून वाचलेल्या माहितीनुसार लॉड्सवर दोन वेगवेगळ्या सामन्यांच्या दोन्ही डावांमध्ये विस्डेननं सुरुवातीपासून शेवटपर्यंत न थकता गोलंदाजी टाकली होती. तसंच अमेरिकेमध्ये एकदा त्यानं ६ चेंडूंमध्ये ६ बळी घेतले होते. [...]
Tags:
25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
pd - April 5, 2022
(PID -87614)
pd - April 5, 2022
md - May 7, 2026
Status - publish