कथा

स्टॅम्प आजोबा

Category:

 

साधारण दर १५-२० दिवसांनी पत्र यायचं .. मन्या तर स्टॅम्प आजोबांची वाटच बघत असायचा .. कधी जरा उशीर झाला की जाता येता विचारायचा .. “स्टॅम्प आजोबा ss .. आलं का पत्र ???” .. साता समुद्रापार असलेल्या मुलाच्या आई वडिलांपेक्षा हाच पत्राची आतुरतेने वाट बघायचा … कारण तेवढेच नवनवीन स्टॅम्प त्याच्या कलेक्शन मध्ये यायचे आणि इतर मित्रांसामोर थोडा भाव सुद्धा खायला मिळायचा

कथा

सुटका

Category:

 

काही दिवसांनी समोरच्या सोसायटीत एक अ‍ॅम्ब्युलन्स आली .. कोणीतरी दोघे उतरले .. बिल्डिंगमधल्या बाकीच्यानी त्यांच्या त्यांच्या खिडकीतून टाळ्या वाजवल्या .. आनंदानी कसल्याश्या घोषणा दिल्याचे आवाज ऐकू आले.

साहित्य - ललित

कठडा

Category:

 

शहराच्या मध्यवर्ती भागात गोलाकार तळं. तळ्याभोवती बसण्यासाठी कठडा. कठड्याला लागून, तलावाच्या परिघात पादचारी मार्ग उर्फ जॉगिंग ट्रॅक. सकाळी आणि संध्याकाळी परिसर अगदी गजबजून जायचा. कोणी फेरफटका मारायला येणारे, कुणी व्यायाम म्हणून चालायला-पळायला येणारे. गप्पा मारायला येणारे ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी, काही प्रेमी युगूलं आणि असे बरेच. “तो” सुद्धा रोज संध्याकाळी एक तास चालायला यायचा.

कथा

गुंतता

Category:

 

लहान असेंन मी त्यावेळी आठवी नववीत जेव्हा त्यांचे लग्न झाले तो गावाकडचा पण शहरात स्थायिक झालेला, चांगली नोकरी होती परंतु लगेचं करत नव्हता. एकदाचे त्याने उशीरा का होईना लग्न केले. ती पण जरा जास्त वयाची होती, थोडी रखडलेली होती. कमी शिकलेली , मॅट्रिकपर्यंत घरात गावी सगळी कामे करत असे.

साहित्य - ललित

फोनाप्पा

Category:

 

आपल्या दैवताशी इतका वेळ अनपेक्षित संभाषण. आप्पांना हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. या सुखद धक्क्यामुळे आप्पा एकदम निःशब्द झाले होते. तरीही धीर करून म्हणाले “मै क्या बोलू समझ मे नही आ रहा. मै आपको हमारे आंजर्ले गाव मे आनेका निमंत्रण देता हू. यहां का निसर्ग और समुद्र आपको जरूर अच्छा लगेगा.

साहित्य - ललित

ब्लाइंड स्पॉट

Category:

 

आज आमच्या आईच्या कौतुक सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून आलात त्यासाठी सगळ्यांचे खूप आभार. तशी ती इथल्या प्रत्येकाची बहीण, मामी, मावशी, आत्या , मैत्रीण अशी कोणी ना कोणीतरी आहेच. तिच्यावरच्या प्रेमापोटीच तर तुम्ही इतक्या आयत्या वेळेस कळवून सुद्धा आला आहात पण तरीही सगळ्यांना प्रश्न पडला असेलच की आज हे तिचं कौतुक नेमकं कशासाठी आहे ??? …. ती काही कोणी मोठी उद्योजिका किंवा मोठ्या हुद्दयावर वगैरे नाही.

साहित्य - ललित

आशीर्वाद

Category:

 

लहान लहान म्हणता म्हणता लेकरू कॉलेजकुमार झाला आणि सहाजिकच बऱ्याच गोष्टी बदलल्या. त्यातलाच एक बदल म्हणजे अभ्यासाची पुस्तकं घेण्याचं दुकान. शालेय पुस्तकं पाठ्यपुस्तक मंडळाची. सगळी अगदी ठरलेली.

साहित्य - ललित

शून्यत्व ……

Category:

 

अनुभव आणि अनुभूती हे शब्द आपण नेहमी ऐकतो अर्थात अनुभूती म्हटले की त्याला अध्यात्मिक टच वगैरे आहे असे मी स्वतः कधीच समजत नाही अर्थात प्रत्येक अनुभव हा अनुभूती देतोच असे नाही कारण अनुभवाची अनुभूती होणे हहे व्यक्तीसापेक्ष आहे. आपण सतत अनेक गोष्टी बघत असतो त्याचा परिणाम आपल्यावर होतोच असा नाही.

साहित्य - ललित

अथांग…..

Category:

 

त्याची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. तो बालहट्ट पुरवत मुलांचे वेगवेगळ्या पोझेस मधले फोटो काढण्यात दंग होता. मध्येच आपल्या कॅमेऱ्यात मावळतीचा सूर्य आणि मुंबईचं देखणं रूप टिपत होता.