क्रीडा-विश्व

शापित गंधर्व – पद्माकर शिवलकर

Category:

 

पत्रिका आणि जन्मवेळ ही अचूक जमायला खरं भाग्य लागतं आणि ते भाग्य प्रत्येक आणि ती भाग्य वेळ प्रत्येकाच्या नशिबात येतेच अशी नाही. मुंबई आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असाच एक शापित गंधर्व जन्माला आला होता. तो ज्या काळात जन्माला त्या काळात क्रिकेट खेळणं हे अतिशय मानाचं होतं तो सन्मान त्याला मिळाला पण त्याला योग्य ते कोंदण मात्र बसलं नाही आणि तो दुर्दैवी खेळाडू होता पद्माकर शिवलकर उर्फ पॅडी …..

क्रीडा-विश्व

हिंदुस्तानी क्रिकेटचा विजय

Category:

 

मला आनंद झाला तो हिंदुस्थानी क्रिकेटचा विजय साजरा झाला म्हणून. मुंबई रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही याच दुःखही तेवढंच आहे. विदर्भाने तिसऱ्यांदा रणजी करंडक जिंकताना आपण पहिल्या दोन्ही वेळेला रणजी करंडक जिंकला तो विजय आपल्या कर्तुत्वावर जिंकला होता. तसेच यंदाही आपलं कर्तृत्व त्यापेक्षाही जास्त सरस होतं यात शंकाच नाही आणि हेच त्यांनी हिंदुस्तानी क्रिकेट जगताला दाखवून दिले.

क्रीडा-विश्व

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचा याराना

Category:

 

सचिन तेंडुलकर आणि विनोदची जोडी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होती.पण कांबळीने क्रिकेटविश्वातून खूप लवकर संन्यास घेतला. कारणं काहीही असली तरी आजही कांबळी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे, आजही त्याची जादू  चहात्यांमध्ये कायम आहे.

क्रीडा-विश्व

देर आए, दुरूस्त आए

Category:

 

बार्बाडोस इथे झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम लढतीत टीम इंडियाने द.आफ्रिकेचा सात धावांनी चित्तथरारक पराभव करत २०१३ नंतर आयसीसी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. दोन्ही संघांनी तुल्यबळ लढत दिल्याने सामना शेवटच्या षटका पर्यंत लांबला. मात्र हार्दिक पांड्याच्या चलाखीने आपला संघ वरचढ ठरला. अनेक उतारचढाव आणि विजयाचा दोलक दोन्ही संघाकडे आलटून पालटून फिरत असल्याने भारतीय पाठीराख्यांचा जीव कासावीस झाला होता.

क्रीडा-विश्व

हिरा है सदा के लिये

Category:

 

असं म्हणतात, पैसा पैशाकडेच जातो.. तसाच हिरा हिऱ्याकडेच जातो, असेही म्हटले तर?धोनीने २०११ चा वनडे वर्ल्डकप जिंकल्यावर या क्षणाची वाट पाहत १३ वर्षे गेली. वनडे वर्ल्डकप आपण सचिनसाठी जिंकत आहोत, ही भावना तेव्हा जवळपास प्रत्येक खेळाडूच्या मनात होती. आज T20 वर्ल्डकप जिंकतानाही भारतीय टीमला असेच काहीसे जाणवले असेल. ८ महिन्यांपूर्वीही ती संधी आली होती. पण… असो.

क्रीडा-विश्व

फिरकीच्या तालावर!

Category:

 

टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दुसर्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मागील टी ट्वेंटी विश्वचषकात टीम इंडीयाला अपशकून करणार्या इंग्लंड संघाचा पुरेपूर बदला घेत टीम इंडियाने विश्वचषकाकडे अंतिम पाऊल टाकले आहे. कर्णधार रोहीतने फलंदाजीत आपली दादागिरी कायम राखत इंग्लंडला आपल्या बॅटचे पाणी पाजले तर गोलंदाजीत अक्षर, कुलदीप द्वयीने अक्षरशः धुमाकूळ घालत इंग्रजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले.

क्रीडा-विश्व

कांगारूंचे गर्वहरण

Category:

 

सेंट ल्युसियाच्या डॅरेन सामी मैदानावर झालेल्या सुपर ऐट सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना लोळवत २०२३ विश्वचषकातला हिशोब चुकता केला आहे. प्रचंड दडपण आणि ह्रदयाची धडधड वाढवणार्या या लढतीत भारतीय गोलंदाजांनी प्रयत्नाची शिकस्त करत बलदंड अॅासी फलंदाजीला नमवले आहे.

क्रीडा-विश्व

लाहोरमधील बाघ-इ-जिन्हा मैदान

Category:

 

बाघ-इ-जिन्हा हे पाकिस्तानातील लाहोर शहरातील एक ऐतिहासिक मैदान आहे. पूर्वी हे मैदान लॉरेन्स गार्डन या नावाने ओळखले जात असे. सध्या मात्र या मैदानाच्या आसपास विविध झाडाफुलांनी बहरलेला मोठा बगिचा आहे. तो बोटॅनिकल गार्डन म्हणून प्रसिद्ध आहे आणि शेजारी एक मशिद आहे.

इंग्लंडमधील व्हिला पार्क मैदान
क्रीडा-विश्व

इंग्लंडमधील व्हिला पार्क मैदान

Category:

 

इंग्लंडमधील अॅस्टन जिल्ह्यातील बर्मिंगहॅम येथील हे प्रसिद्ध फुटबॉल मैदान आहे. १८९७ पासून ॲस्टन व्हिला फुटबॉल क्लबचे ते होम ग्राउंड आहे. १६ इंटरनॅशनल सामन्यांचे यजमानपद व्हिला पार्कने यशस्वी केले. १८९९ मध्ये तेथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना झाला. इंग्लंडमधील हे पहिले वहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे फुटबॉल मैदान आहे.