मुक्या वेदना

प्रेमाच्या जुन्या आठवणीं
आता सुन्या झाल्या आहेत
अव्यक्त अश्या त्या वेदना
आता मुक्या झाल्या आहेत

माझ्या सुंदर अश्या जीवनातून
तू का गेली ते कळलच नव्हतं
तू नसलेल्या त्या गोष्टींमध्ये
मन माझं कधी रमलच नव्हतं

अडकलेल्या पाशातून स्वतःला
मुश्किलीनं सोडवलं मी
नव्या स्नेह बंधनात मनाला
अगदी हलकेच गुंतवलं मी

माझा तर प्रेमावरचा
विश्वासच असता उडाला
कोमल नव्या प्रेमाचा गंध
मला जर नसता लाभला

प्रेमाच्या त्या आठवणीं
आता जुन्या झाल्या आहेत
अव्यक्त अश्या त्या वेदना
आता मुक्या झाल्या आहेत

थकलेले आयुष्य आता
उतार आला असं सांगतयं
जगलेल्या साऱ्या दिवसांचा
हिशोब मला मागतयं

भेटीच्या त्या जून्या जागा
आता खूणवू लागल्या आहेत
तुटलेले ते धागे आता
मनाला विनवू लागले आहेत

पूर्वीच्या त्या साऱ्या उणीवा
आता मानवू लागल्या आहेत
न पुसलेल्या त्या खूणा
पुन्हा जाणवू लागल्या आहेत

आठवणींच्या जुन्या जखमा
आता सुक्या झाल्या आहेत
अव्यक्त अश्या त्या वेदना
आता मुक्या झाल्या आहेत

- डॉ. सुभाष कटकदौंड



प्रेमाच्या जुन्या आठवणीं
आता सुन्या झाल्या आहेत
अव्यक्त अश्या त्या वेदना
आता मुक्या झाल्या आहेत

माझ्या सुंदर अश्या जीवनातून
तू का गेली ते कळलच नव्हतं
तू नसलेल्या त्या गोष्टींमध्ये
मन माझं कधी रमलच नव्हतं

अडकलेल्या पाशातून स्वतःला
मुश्किलीनं सोडवलं मी
नव्या स्नेह बंधनात मनाला
अगदी हलकेच गुंतवलं मी

माझा तर प्रेमावरचा
विश्वासच असता उडाला
कोमल नव्या प्रेमाचा गंध
मला जर नसता लाभला

प्रेमाच्या त्या आठवणीं
आता जुन्या झाल्या आहेत
अव्यक्त अश्या त्या वेदना
आता मुक्या झाल्या आहेत

थकलेले आयुष्य आता
उतार आला असं सांगतयं
जगलेल्या साऱ्या दिवसांचा
हिशोब मला मागतयं

भेटीच्या त्या जून्या जागा
आता खूणवू लागल्या आहेत
तुटलेले ते धागे आता
मनाला विनवू लागले आहेत

पूर्वीच्या त्या साऱ्या उणीवा
आता मानवू लागल्या आहेत
न पुसलेल्या त्या खूणा
पुन्हा जाणवू लागल्या आहेत

आठवणींच्या जुन्या जखमा
आता सुक्या झाल्या आहेत
अव्यक्त अश्या त्या वेदना
आता मुक्या झाल्या आहेत

– डॉ. सुभाष कटकदौंड

Author