१ – मोरया हो

देवा मोरया हो , राया मोरया हो

अमुच्या गेहीं जन्म-उत्सवीं प्रतिवर्षीं या हो ।।

हे गौरीसुत मंगलमूर्ती

दिगंत गाजे तुमची कीर्ती

रूप मनोहर, हे लंबोदर, दृष्टि नित्य पाहो ।।

मुख हें, गजमुख-स्तोत्रगायना

कर उधळोत तुम्हांवर सुमनां

तुमच्या पुण्यद पायांवर हा नित माथा राहो ।।

प्रदक्षिणा पद करो मंदिरा

कान ऐकुं दे तव शुभ-मंत्रा

उत्सवसमयीं तुमच्या मूर्तिस अमुचें शिर वाहो ।।

गेह आमुचें करता पावन

देह तुम्हां वंदण्यां समर्पण

सुखमय होण्यां जीवन, आशिर्वाद अम्हां द्या हो ।।

- - -

- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

– – –

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

Author