मालतीमाधवम्

मालतीमाधवम् हे महाकवी भवभूती यांचे नाटक .भवभूती आठव्या शतकात होऊन गेलेले महाकवी. मालतीमाधव हे दहा अंकाचे प्रकरण आहे. यात मालती आणि माधव यांचे प्रेम प्रकरण वर्णन करण्यात आले आहे.



मालतीमाधवम् हे महाकवी भवभूती यांचे नाटक .भवभूती आठव्या शतकात होऊन गेलेले महाकवी. मालतीमाधव हे दहा अंकाचे प्रकरण आहे. यात मालती आणि माधव यांचे प्रेम प्रकरण वर्णन करण्यात आले आहे.
पद्मवटी च्या भूरीवसू याच्या मुलीचे नाव आहे मालती. तर विदर्भ निवासी देवरात याच्या मुलाचे नाव आहे माधव. भूरीवसू आणि देवरात लहानपणीचे मित्र असतात. त्यांचे लहानपणी ठरलेले असते की आपल्या मुलांचे मोठेपणी लग्न करावे.

पद्मावती चा राजा चा सचिव आहे नंदन. माधव चा मित्र मकरंद आणि नंदनची बहिण मदयंतिका यांचे देखील प्रेमप्रकरण आहे. या सगळ्यांची सहयोगी असणाऱ्या कामंदकी च्या माध्यमातून मालती आणि माधव यांची शिवमंदिरात भेट होते.

राजाने मात्र तिचा विवाह नंदन सोबत ठरवलेला आहे. भूरीवसु आपल्या मुलीचे लग्न आपल्या पूर्वीच्या मित्रासोबत लावण्यास तयार आहे. पण राजाच्या आज्ञे समोर त्याचा नाईलाज आहे. राजाची आज्ञा ऐकून मालती देखील खिन्न होते.

मात्र वर उल्लेख केल्याप्रमाणे मंदिरात भेटलेल्या माधव आणि मालती यांच्या परस्पर प्रेमाला लक्षात घेऊन कामंदकी त्यांना वासवदत्ता आणि शकुंतला यांचे उदाहरण देत त्यांचा गंधर्व पद्धतीने विवाह करून देते. अशी नाटकाची साधारण कथा आहे.

महाकवी भवभूती यांच्या तीन नाटकांपैकी सामान्यतः पहिले असणारे हे नाटक केवळ काल्पनिक कथानकावर आधारलेले आहे. यामध्ये महा कवींनी पद्यरचना करतानादेखील खूप मोठ्या प्रमाणात सामासिक रचना वापरली आहे त्या काळातील समाजजीवन, लोकांची मानसिकता इत्यादी गोष्टी जाणून घेण्यासाठी हे नाटक अत्यंत सुंदर साधन आहे.

यानंतर भवभूती यांनी लिहिलेल्या महावीरचरित आणि उत्तररामचरितम् यांच्या तुलनेत येथे कवी नवखे असले तरी एक सुंदर प्रेमकथा यादृष्टीने संस्कृत साहित्यात या नाटकाचे महत्त्वाचे स्थान आहे.

आचल गजानन जेऊरकर
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. द्वितीय वर्ष
दि. २७. ०४. २०२२

Author