माझ्या कविता वाचून
माझ्या प्रेमात पडू नकोस
विचार मला त्या कवितेतील
प्रत्येक ओळींचा अर्थ…
माझ्या कवितेची प्रत्येक ओळ
आहे एक प्रेम मंत्र
जीवनातील एक रहस्य
न सुटलेल्या साऱ्या
कोड्यांचं उत्तर…
प्रेमात पडणं सोप्प असत
पण जगण अवघड
ते अवघड सोप्प कस करायचं
ते सांगते ती माझी कविता…
म्हणून माझ्या कविता वाचून
माझ्या प्रेमात पडू नकोस
माझ्या प्रेमात पडून
मग माझ्या कविता वाच
तुझेच जगणे सोप्पे होईल…
कवी – निलेश बामणे ( बी डी एन)
Author
Post Views: 8